लातूर जिल्ह्यात दारूबंदीचा ठराव

By Admin | Updated: December 30, 2015 00:39 IST2015-12-30T00:39:04+5:302015-12-30T00:39:04+5:30

दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे सांगत येथील जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडलेल्या दारुबंदीच्या ठरावाला

Latur resolution in Latur district | लातूर जिल्ह्यात दारूबंदीचा ठराव

लातूर जिल्ह्यात दारूबंदीचा ठराव

लातूर : दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे सांगत
येथील जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडलेल्या दारुबंदीच्या ठरावाला सदस्यांनी एकमुखाने अनुमोदन देत तो मंजूर केला. तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर यांनी ठराव मांडला. त्यास भाजपाचे गटनेते रामचंद तिरूके आणि सदस्य भरत गोरे यांनी अनुमोदन दिले़ शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करणार असल्याचे निलंगेकर
यांनी सांगितले़
स्थायीच्या बैठकीत दारुबंदीच्या ठरावावर चर्चा झाली. जिल्ह्यातील तरुण व्यसनाधिनतेकडे ओढले
जात आहेत़ तरुणाईला दारुच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी जिल्ह्यात दारुबंदी आवश्यक असल्याचे अशोकराव पाटील यांनी सांगितले. नव्या वर्षात लातूर जिल्हा दारु मुक्त होईल, अशी आशा जि़प़ सदस्य राजकुमार पाटील यांनी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)

Web Title: Latur resolution in Latur district