शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लातूर-निलंगा रस्त्यावर पुन्हा अपघात; ३ ठार, ८ गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 02:05 IST

लातूर-निलंगा रस्त्यावर शुक्रवारी रात्री ११़५० वाजता एस़टी़ व ट्रकचा अपघात झाला़ यात तिघेजण जागीच ठार झाले असून, ८ जण गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

 लातूर - लातूर-निलंगा रस्त्यावर शुक्रवारी रात्री ११़५० वाजता एस़टी़ व ट्रकचा अपघात झाला़ यात तिघेजण जागीच ठार झाले असून, ८ जण गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.गेल्या १५ दिवसांत एकाच रस्त्यावर झालेला हा तिसरा अपघात आहे़ शुक्रवारी रात्री ११़१० वाजता लातूर-हैदराबाद जाणारी एस़टी़ लातूर बसस्थानकावरून निघाली़ औशाच्या पुढे आल्यानंतर चलबुर्गा पाटीजवळ ११़५० च्या सुमारास एस़टी़ क्ऱ एमएच २०, ३५८७ व ट्रक क्रमांक एपी २४ व्ही ८८३८ यांची धडक झाली़ यामध्ये अंकिता अमित भोज (३३ रा. दापका वेस, निलंगा) यांच्यासह तिघेजण ठार झाले असून, दोघांची नावे कळू शकली नाहीत़ तर जखमींमध्ये अमित भोज गंभीर असून, दीपक गुंडेवार नाईक, दीपाली दीपक नाईक, गिरीश गुंडेवार नाईक, नागनाथ कलप्पा हंसराळे यांच्यासह काही जण किरकोळ जखमी आहेत. त्यांना लातूरहून येणारे ईश्वर पाटील यांनी आपल्या वाहनातून निलंगा येथे उपचारासाठी आणले. तसेच अन्य जखमींना लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात हलविले आहे. घटनास्थळी किल्लारीचे सपोनि भोसले तातडीने पोहोचले. लातूर ते निलंगा या रस्त्यावर हा तिसरा मोठा अपघात आहे़ १८ नोव्हेंबर २०१७ रोजी एस़टी़-ट्रकच्या अपघातात ७ जण जागीच ठार झाले होते़ तर २६ नोव्हेंबर रोजी याच परिसरात झालेल्या कार अपघातात तिघे ठार झाले होते़जम्पिंग रस्ता...अपघात प्रवण क्षेत्र बनलेल्या औसा ते निलंगा दरम्यान, अनेक ठिकाणी हा रस्ता जम्पिंग आहे़ त्यामुळे नियमित किरकोळ अपघात होतात़ दरम्यान, गेल्या १५ दिवसातील तिसरा मोठा अपघात आहे़

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर