लातूर: पिण्याच्या पाण्यातून विषबाधा, 40 जणांची प्रकृती चिंताजनक
By Admin | Updated: February 26, 2017 08:53 IST2017-02-26T08:53:23+5:302017-02-26T08:53:23+5:30
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातल्या केंद्रेवाडी येथे पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याची घटना

लातूर: पिण्याच्या पाण्यातून विषबाधा, 40 जणांची प्रकृती चिंताजनक
>ऑनलाइन लोकमत
लातूर , दि. 26 - लातूरच्या अहमदपूर तालुक्यातल्या केंद्रेवाडी येथे पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 40 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना अहमदपूर येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
केंद्रेवाडी या गावाला सरकारी पाण्याची टाकी नसल्याने हौदातून गावाला पाणीपुरवठा केला जातो. या हौदात कुणीतरी सूडबुद्धीने थायमेट हे विषारी औषध मिसळले असल्याचा गावकऱ्यांचा अंदाज आहे. यामुळे अनेकांना उलट्या आणि जुलाबचा त्रास सुरु झाला. तर काही जण चक्कर येऊन कोसळले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकालानंतर सूडबुद्धीने हे कृत्य केल्याचा पोलिसांनाही संशय आहे.