शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात देशमुखांचा चौकार की अर्चना पाटील चाकूरकर ठरणार जायंट किलर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 15:08 IST

Maharashtra Election 2024 : लातूर शहरासह परिसरातील २९ गावे शहर विधानसभा मतदारसंघात आहेत. ४ लाख १४५ मतदार असून, गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे.

हणमंत गायकवाड, लातूर Latur City Assembly election 2024: काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक करणारे माजी मंत्री आ. अमित देशमुख चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्यासमोर भाजपत नव्याने दाखल झालेल्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांचे आव्हान आहे. एकूण २३ उमेदवार रिंगणात असले तरी सामना देशमुख विरुद्ध चाकूरकर असा दुरंगी दिसत आहे. (Amit Deshmukh vs Archana Patil Chakurkar)

लातूर शहरासह परिसरातील २९ गावे शहर विधानसभा मतदारसंघात आहेत. ४ लाख १४५ मतदार असून, गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे. अमित देशमुख गेल्या पंधरा वर्षांपासून मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. 

त्यापूर्वी पाच वेळा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या भागाचे नेतृत्व केले आहे. जवळपास ४० वर्षांपासून लातूर मतदारसंघावर काँग्रेसचेच वर्चस्व आहे.

आता भाजपने चाकूरकर घराण्यातील उमेदवार देऊन ही निवडणूक चर्चेत आणली. त्याचवेळी वंचित आघाडीचे विनोद खटके काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांविरुद्ध भूमिका मांडत आहेत.

मतदारसंघातील कळीचे मुद्दे 

लातूर शहराला कायमस्वरुपी पाणीपुरवठा करण्यासाठी उजनीचे पाणी आणण्याचा विषय प्रलंबित आहे. विमानतळावरून राज्यांतर्गत तसेच २ मोठ्या शहरांसाठी विमानसेवा सुरू होण्याची गरज चर्चेत आहे. लातूर शहरातील कचरा, तरुणांच्या रोजगारांचे प्रश्न, जिल्हा रुग्णालयाच्या जागा हस्तांतरणाचा प्रश्न रखडलेला आहे. सोयाबीनची हमीभावाप्रमाणे खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.भाजपने जातीय समीकरणाची जुळवाजुळव करीत प्रचारात रंग भरले आहेत. त्याचवेळी काँग्रेसने या समीकरणांना थोपण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. शहराची सुरक्षितता, शांतता व एकोपा आणि राज्य नेतृत्वाचा मुद्दा काँग्रेसच्या प्रचाराचा गाभा आहे.

२०१९ मध्ये निकाल काय?

अमित देशमुख यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लाखाहून अधिक मते घेतली होती. अमित देशमुख यांना १ लाख ११ हजार १५६ मते मिळाली होती. तर भाजपचे शैलेश लाहोटी यांना ७० हजार ४७१ मते मिळाली होती. २०१९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी होती. तर शिवसेना आणि भाजप यांची युती होती. पण, यावेळी तीन-तीन पक्षाच्या दोन आघाड्या झाल्या आहेत. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकlatur-city-acलातूर शहरAmit Deshmukhअमित देशमुख