लातूरमध्ये पैसे वाटताना पकडले
By Admin | Updated: October 15, 2014 03:23 IST2014-10-15T03:23:30+5:302014-10-15T03:23:30+5:30
चाकूर तालुक्यातील रोहिणा गटातील राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य व अन्य काहीजण मतदारांना पैसे वाटप करीत असताना चाकूर पोलिसांनी त्यांच्याजवळील रोख २ लाख ६७ हजार रुपये सोमवारी रात्री जप्त केले

लातूरमध्ये पैसे वाटताना पकडले
देवणी / चाकूर (लातूर) : चाकूर तालुक्यातील रोहिणा गटातील राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य व अन्य काहीजण मतदारांना पैसे वाटप करीत असताना चाकूर पोलिसांनी त्यांच्याजवळील रोख २ लाख ६७ हजार रुपये सोमवारी रात्री जप्त केले. दोघांना अटक केली असून दोघे फरार आहेत़
अहमदपूर मतदारसंघातील चाकूर तालुक्यातील रोहिणा येथे राष्ट्रवादीचे जिप सदस्य सुदर्शन मुंडे, शिवाजी म्हेत्रे, लहु बिराजदार, माधव बिराजदार हे चौघे सोमवारी रात्री मतदारांना पैसे वाटप करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ पोलिसांनी धाड टाकून रोख २ लाख ६७ हजार रुपये, राष्ट्रवादीच्या पत्रिकेचे बंडल, अन्य साहित्यासह एक जीप व दुचाकी पोलिसांनी जप्त केली़ पोलिसांनी शिवाजी म्हेत्रे व माधव बिराजदार यांना अटक केली़ तर जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन मुंडे व लहु बिराजदार हे फरार झाले़ तर निलंगा मतदारसंघातील देवणी येथे एका कारमधून मंगळवारी ४५ लाख रुपये जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीत ही रक्कम महाराष्ट्र ग्रामीण बँकेची असल्याचे समोर आले. पोलिसांनी ताब्यात घेतलेला कर्मचारी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वलांडी शाखेचा रोखपाल असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. (प्रतिनिधी)