शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले

By राजकुमार जोंधळे | Updated: July 21, 2025 00:16 IST

Latur News: ‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांना झालेल्या मारहाणीचे लातूर शहरात रात्री उशिरापर्यंत तीव्र पडसाद उमटत हाेते. ‘छावा’चे कार्यकर्ते रविवारी रात्री रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत हाेते. काहींनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे मुख्य मार्गावर लावलेले बॅनर फाडले.

- राजकुमार जाेंधळेलातूर - ‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांना झालेल्या मारहाणीचे लातूर शहरात रात्री उशिरापर्यंत तीव्र पडसाद उमटत हाेते. ‘छावा’चे कार्यकर्ते रविवारी रात्री रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत हाेते. काहींनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे मुख्य मार्गावर लावलेले बॅनर फाडले.

राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान आपली भूमिका मांडताना ॲड. घाडगे-पाटील यांनी पत्ते उधळत मागण्या मांडल्या आणि निवेदन दिले. त्यानंतर ते विश्रामगृहात थांबलेले असताना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व ‘छावा’चे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी राष्ट्रवादीच्या काहीजणांनी ॲड. घाडगे पाटील व तेथील एकदाेघांना मारहाण केली. पाेलिस येईपर्यंत बराच गदाराेळ सुरू हाेता. स्थानिकचे कार्यकर्ते हस्तक्षेप करून भांडणे नकाे, असे आवाहन करीत हाेते. परंतु, जबर मारहाणीमुळे वातावरण तापले. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा औसा राेडवर ‘छावा’च्या काही संतप्त कार्यकर्त्यांनी बॅनर फाडत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीविराेधात जाेरदार घाेषणाबाजी सुरू केली. त्यावेळी तत्परतेने पाेलिस दाखल झाले. त्यांनी शांततेचे आवाहन केले. काही वेळानंतर जमाव पांगला. पाेलिसांनी रात्री उशिरापर्यंत बंदाेबस्त वाढविला हाेता.

विविध स्तरांतून निषेध...मारहाणीच्या घटनेनंतर काॅंग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी निषेध नाेंदविला. तसेच साेमवारी हाेणाऱ्या सर्वपक्षीय बंद आंदाेलनामध्ये आम्ही सहभागी आहाेत, असे सांगितले. शेतकऱ्याच्या आंदाेलनाला दडपणाऱ्यांना जनता धडा शिकवेल. दरम्यान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव म्हणाले, हा पक्षीय विषय नाही. शेतकऱ्याच्या मुलावर झालेला भ्याड हल्ला आहे.

टॅग्स :laturलातूरAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस