शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिवंगत रा. ग. जाधव यांना तावडेंनी पाठविले शुभेच्छापत्र! जाधव यांच्या नावे साधना ट्रस्टच्या पत्त्यावर पाठविण्यात आले पत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 04:50 IST

राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी दिवंगत साहित्यिकाला अभिष्टचिंतनाचे पत्र पाठवल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे आणि गेल्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेले ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक रा. ग. जाधव यांना विनोद तावडेंकडून चक्क वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र पाठविण्यात आले आहे.

पुणे : राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी दिवंगत साहित्यिकाला अभिष्टचिंतनाचे पत्र पाठवल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे आणि गेल्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेले ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक रा. ग. जाधव यांना विनोद तावडेंकडून चक्क वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र पाठविण्यात आले आहे.मुंबई विद्यापीठाचा रखडलेला निकाल, पेपर तपासणीतील गोंधळ यामुळे विनोद तावडे यापूर्वीच टीकेचे लक्ष्य ठरले आहेत. त्यातच आता सांस्कृतिक खात्याकडून तावडेंची स्वाक्षरी असलेले शुभेच्छापत्र रा. ग. जाधव यांच्या नावे साधना ट्रस्टच्या पत्त्यावर पाठविण्यात आले आहे. ‘आपण कठोर परिश्रम करून आजवरचा प्रवास यशस्वी केला आहे. येणाऱ्या आयुष्यात आपल्याला स्वत:तील विविध पैैलू उमगावेत आणि त्यातून यशाच्या उत्तुंग शिखरावर आपण पोहोचावे, ही मनोकामना आहे. हा वाढदिवस आपल्याला आनंददायी आणि प्रेरणादायी ठरो’, अशा आशयाचा मजकूर या पत्रामध्ये आहे.राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रा. रा. ग. जाधव यांना फेब्रुवारी २०१६मध्ये तावडे यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला होता. तर, २७ मे रोजी जाधव यांचे निधन झाले त्यावेळी जाधव यांना राज्य सरकारतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली होती. तावडेंनीही शोकसंदेश पाठवला होता. २४ आॅगस्ट रोजी जाधव यांची जयंती आहे. साहित्यिकाच्या निधनाचा विसर पडून त्यांना शुभेच्छा पाठवणाऱ्या तावडेंच्या या अजब कारभाराबाबत साहित्य क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे.नजरचुकीने पत्र पाठवलेपरभणीचे संघाचे कार्यकर्ते रमेश जाधव यांचा वाढदिवस त्याच दिवशी होता. दोन नावांतील समानतेमुळे नजरचुकीने साहित्यिक रा. ग. जाधव यांना शुभेच्छापत्र पाठविले गेले, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहोत, असे स्पष्टीकरण सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेBJPभाजपा