शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

सप्तसूर पोरके झाले; आज राज्यात सार्वजनिक सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 07:07 IST

स्मशानभूमीच्या बाहेर अंत्यसंस्कार करण्याची ही तिसरीच वेळ आहे. यापूर्वी शिवाजी पार्कवरच नोव्हेंबर २०१२मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तर, ऑगस्ट १९२०मध्ये गिरगाव चौपाटी येथे लोकमान्य टिळक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. 

मुंबई : गेला महिनाभर दीदी येथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात कोरोना, न्यूमोनियाशी झुंज देत होत्या. अखेर रविवारी सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी त्यांनी आयुष्याची भैरवी पूर्ण केली. त्याचवेळी जगाच्या पाठीवर प्रत्येक मिनिटाला कुठेना कुठे दीदींचा सूर निनादत होता... 

त्यांच्या पश्चात आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर ही चार भावंडे आणि अगणित चाहता परिवार आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याने ८ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातच त्यांना न्यूमोनियाचे निदान झाले. तेव्हापासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. २२ जानेवारी रोजी त्या कोरोना आणि न्यूमोनियामुक्त झाल्या. त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा होत होती. त्यामुळे व्हेंटिलेटर काढण्यात आले; पण त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना आयसीयूमध्येच ठेवण्यात आले होते. शनिवारी त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

अशी तिसरीच घटना -स्मशानभूमीच्या बाहेर अंत्यसंस्कार करण्याची ही तिसरीच वेळ आहे. यापूर्वी शिवाजी पार्कवरच नोव्हेंबर २०१२मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तर, ऑगस्ट १९२०मध्ये गिरगाव चौपाटी येथे लोकमान्य टिळक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. अपवादात्मक परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्याचे अधिकार महापालिका आयुक्त किंवा राज्य सरकारला आहेत. त्यानुसार, लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आज राज्यात सार्वजनिक सुट्टी -भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार, ७ फेब्रुवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या संदर्भात राज्य शासनातर्फे रविवारी काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून, त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कलाविश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये सोमवारी बंद राहतील. 

 एका डोळ्यात काही गेले, तर दुसऱ्यातून आपोआप पाणी येते; आमच्या दोघींमध्ये हेच एक साम्य होते...माझी मते आणि तिची मते यात दोन टोकांचे अंतर आहे. मी बॉब करते. ती दोन वेण्या घालते. मी रुंद गळ्याचे ब्लाऊज घालते तर ती बंद गळ्याचे. ती सारखी पांढऱ्या रंगाचा पोशाख करते. तर मला गुलाबी रंग प्रिय. माझ्या तिच्या राहणीत, विचारात, फार फरक आहे. एवढेच काय, मी एकदम फटकळ, तर ती सगळे मनात ठेवणारी. ती बारीक सडसडीत, तर मी चांगली गरगरीत. ती नाजूक, सॅड गाणी गाते, तर मी सगळ्या ढंगांची गाणी गाते. ती म्हणते मी कलेसाठी जगते. मी म्हणते कला माझ्यासाठी आहे. सगळे म्हणतात, या दोघीजणी दोन डोळ्यांसारख्या आहेत. दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी. पण त्यांना हे माहिती नाही की या दोन्ही डोळ्यांना प्रकाशाची जाणीव देणाऱ्या नसा एकच आहेत. म्हणून एका डोळ्यात काही गेले, तर दुसऱ्यातून आपोआप पाणी येते...     - आशा भोसले 

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरMaharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यू