हनुमंत उपरे यांना अखेरचा निरोप

By Admin | Updated: March 21, 2015 01:30 IST2015-03-21T01:30:04+5:302015-03-21T01:30:04+5:30

सत्यशोधक ओबीसी परिषदेचे संस्थापक तथा परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते हनुमंत उपरे ऊर्फ काका यांना शुक्रवारी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.

Last reply to Hanumant aliens | हनुमंत उपरे यांना अखेरचा निरोप

हनुमंत उपरे यांना अखेरचा निरोप

बीड : सत्यशोधक ओबीसी परिषदेचे संस्थापक तथा परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते हनुमंत उपरे ऊर्फ काका यांना शुक्रवारी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. बौद्ध पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.
हनुमंत उपरे यांचे गुरुवारी मुंबई येथील ब्रीचकँडी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले होते. त्यानंतर शुक्रवारी पहाटे त्यांचे पार्थिव बीड येथील निवासस्थानी आणण्यात आले होते. शुक्रवारी शहरातील प्रमुख भागांतील रस्त्यावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. संतोष व संदीप उपरे यांनी त्यांना अग्निडाग दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Last reply to Hanumant aliens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.