शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वे मार्गावर २१ ठिकाणी रुळांखाली भूस्खलन; रेल्वेसेवा सुरळीत करण्याचं प्रयत्न सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 19:45 IST

17 ठिकाणी कल्याण-पुणे मार्गावर, 4 ठिकाणी नाशिक मार्गावर भूस्खलन

डोंबिवली: मध्य रेल्वेच्या टिटवाळा-इगतपुरी आणि अंबरनाथ-लोणावळा मार्गावरील भोर आणि थळ घाटात झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे कडे कोसळले, रेल्वे रूळ वाहून जाणे, रुळावर माती साचणे, जलभराव,  झाडे पडणे,  ओएचई व सिग्नल पोस्टचे नुकसान इत्यादीमुळे दोन्ही विभागांवरील रेल्वे सेवा प्रभावित झाली. दक्षिणपूर्व घाटावर सुमारे २१ ठिकाणी भूस्खलन / पावसाच्या अडथळ्यांची ज्यात ३ ठिकाणी जास्त प्रमाणात क्षति झाल्याची नोंद झाली. २०० मजुरांसह ४ जेसीबी आणि २ पोकलेन क्षतिग्रस्त ठिकाणी पोहोचले आहेत आणि युद्धपातळीवर काम करत आहेत.

पाणी भरणे, रुळाखालील माती वाहून जाणे, भूस्खलन, घाटा मध्ये कडे कोसळणे, नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहणे इत्यादीमुळे सुमारे २१ ठिकाणी अडथळे निर्माण झाले होते. सुमारे ४३०० घन मीटर रुळाखालील माती वाहून गेली. सुमारे १९००  घन मीटर एवढे भूस्खलन व दरडी कोसळल्या. विविध ठिकाणी काम करणाऱ्या  कामगारांचा मागोवा: एकूण ९५० कामगार, सुपरवायझर ७५ आणि अधिकारी ३८ अविरतपणे रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी कार्यरत आहेत.

कसारा येथे अवघ्या चार तासांत झालेला १३६ मिमी पाऊस आणि कर्जतमध्ये एका तासामध्ये (मध्यरात्री १.०० ते २.०० वाजेपर्यंत) झालेला ८६.६ मिमी पाऊस यावरून मध्यरात्रीपासून झालेल्या पावसाच्या तीव्रतेचा अंदाज घेतला जाऊ शकतो. हे प्रसिद्धी पत्रक जारी होईपर्यंत कर्जत येथे १५७.७ मिमी आणि लोणावळ्यात १७८ मिमी पावसाची नोंद झाली.त्यानुसार महाव्यवस्थापक अलोक कंसल यांनी रेल्वे सेवा त्वरित पूर्ववत करण्यासाठी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असल्याचे सांगण्यात आले. अतिरिक्त महाव्यवस्थापक, प्रधान विभागीय मुख्याधिकारी, इतर  मुख्याधिकारी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक व अन्य वरिष्ठ अधिकारी अविरतपणे कार्यरत आहेत. बोल्डर विशेष गाड्या, विविध मशीन्स, मजूर इत्यादी प्रभावित ठिकाणी कार्यरत आहेत.मध्य रेल्वे प्रशासनाने दोन स्थानकांच्या मध्ये गाड्या अडकून पडू नये यासाठी विशेष काळजी घेत,  कसारा, इगतपुरी, बदलापूर, खडावली इत्यादी स्थानकांवर गाड्यांचे नियमन केले. अनेक गाड्या रद्द केल्या, काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले, तर काही गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येऊन तेथूनच परत पाठविण्यात आल्या.

मुसळधार पाऊस, रस्त्यावरील अडथळे असूनही, मुंबईच्या पथकाने मुख्यालयाच्या मार्गदर्शनाखाली पडलेले कडे बाजूला करणे, पडलेली झाडे बाजुला सारून, ट्रॅक वॉशआउट वगैरे अडथळे दूर करीत, थळ घाट विभागात अडकलेल्या तीन गाड्या आणि भोर घाट विभागातील एक गाडीसाठी मार्ग तयार करून  सुरक्षित स्थानकापर्यंत नेण्यात आल्या. एनडीआरएफच्या टीमलाही बोलविण्यात आले आणि कसारा येथे कोणत्याही घटनेसाठी तयार ठेवले.

मदत केंद्रे  अडकलेल्या प्रवाशांच्या माहितीसाठी कल्याण, कसारा, इगतपुरी आणि लोणावळा येथे मदत केंद्र  उघडण्यात आले. प्रवाशांच्या वाहतुकीसाठी कसारा व इगतपुरी येथे बसेसची व्यवस्था करण्यात आली.  नियमन केलेल्या गाड्यांमधील प्रवाश्यांसाठी स्थानकांवर चहा, कॉफी, स्नॅक्स सारख्या नाश्त्याची व्यवस्था केली गेली. प्रवाशांच्या सोयीसाठी केटरिंग स्टॉल्सही सुरू करण्यात आले. यासंदर्भात सतत उदघोषणा देखील करण्यात आल्या. इगतपुरीहून 75 बसेस (इगतपुरी ते कल्याणकडे जाणाऱ्या ४८३५ प्रवाशांसाठी); कसारा येथे 29 बसेस (कसारा ते कल्याणकडे जाणार्‍या १२४९ प्रवाशांसाठी) व्यवस्था करण्यात आली.महामार्ग खंडित असूनही 2 बोल्डर स्पेशल, 4 बालास्ट रॅक, 2 पोकलेन्स आणि 4 जेसीबी कामगार व यंत्रसामग्रीसह त्वरित पाठविण्यात आले आहेत. प्रभावित ठिकाणी अधिक मशीन्स तैनात करण्यात येत  आहेत.अंबरनाथ-बदलापूर विभाग १२ तासांच्या विक्रमी वेळेत दुरुस्त करण्यात आला आणि उपनगरी सेवा अंबरनाथ ते बदलापूरपर्यंत १०.३५ वाजता वाढविण्यात आल्या.उंबरमाली - ०५.३० वाजता डाऊन लाईन व ०७.१५ वाजता अप लाईन मार्ग सुरक्षित असल्याचे सांगण्यात आलेचौक येथे ११.११ वाजता ट्रॅक सेफ देण्यात आला

पनवेल-कर्जत विभागातील गिट्टी भरुन घेण्यात आले आणि १०.१५ वाजता ट्रॅक फिट देण्यात आले.वासिंद - खडावली विभागात १०० हून अधिक मजूर काम करीत आहेत दुरुस्तीचे काम १३.२१ वाजता पूर्ण झाले, कसारा-इगतपुरी दरम्यान १३.१२ वाजता अप आणि डाऊन लाईन फीट देण्यात आले.

बदलापूर ते कर्जत दरम्यान भिवपुरी रोड येथे सुमारे 25 मजूर सेवा पूर्ववत करण्याच्या कामावर आहेत. बदलापूर - वांगणी विभागातील पुराचे पाणी कमी झाल्यावर रुळांच्या स्थितीचे मूल्यांकन केले जाणार आहे.गुरुवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत इंटरसिटी गाड्यांसह लांब पल्ल्याच्या ३४ गाड्या रद्द केल्या; लांब पल्ल्याच्या २६ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले;  इंटरसिटी गाड्यांसह लांब पल्ल्याच्या ३६ गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या, लांब पल्ल्याच्या ६ गाड्या टर्मिनेट केलेल्या स्थानकातूनच सोडण्यात आल्या.

उपनगरी गाड्या सुरुवातीला केवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - अंबरनाथ / टिटवाला विभागात धावत होत्या. सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बदलापूर पर्यंत सेवा सुरू करण्यात आल्या. उत्तर- पूर्व घाट विभागातील अप व डाऊन लाईन्स १३.१५ वाजता सुरक्षित करण्यात आल्या आणि १५.०० वाजता कल्याण-कसारा विभागावर वाहतुकीस सुरुवात झाली. यादरम्यानच्या   काळात हार्बर लाइन,  ट्रान्स हार्बर लाइन आणि चौथा कॉरिडोर (नेरुळ / बेलापूर-खारकोपर विभाग) सेवा सुरु होत्या. त्याविषयीची माहिती उदघोषणांच्या माध्यमातून सतत उपलब्ध करुन दिली जात होती. याशिवाय सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून नियमित अपडेट देण्यात आली.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेlandslidesभूस्खलन