उत्तनकरांचा भूमाफियांना दणका
By Admin | Updated: April 13, 2015 05:18 IST2015-04-13T05:18:33+5:302015-04-13T05:18:33+5:30
उत्तन येथील शिरे मार्गावर असलेल्या ढोल्या कुुटंबाच्या जागेत भूमाफिया कुरेशी बंधुंनी बांधलेल्या बेकायदेशीर कुपणांवर स्थानिकांनी रविवारी हल्लोबोल करुन त्यांच्या कुंपणाला जमिनदोस्त केले.

उत्तनकरांचा भूमाफियांना दणका
भार्इंदर : उत्तन येथील शिरे मार्गावर असलेल्या ढोल्या कुुटंबाच्या जागेत भूमाफिया कुरेशी बंधुंनी बांधलेल्या बेकायदेशीर कुपणांवर स्थानिकांनी रविवारी हल्लोबोल करुन त्यांच्या कुंपणाला जमिनदोस्त केले.
एमएमआरडीए (मुंबई प्रदेश प्रादेशिक विकास प्राधिकरण) मार्फत उत्तनसह आसपासच्या गावांना विशेष पर्यटन क्षेत्रात समाविष्ट केले आहे. यामुळे येथील जमिनींना सोन्याचा भाव आल्याने येथील भूमाफियांकडून जमीन हडपण्यास सक्रीय झाले आहेत. त्यात येथील बॉबी, शालु, लियाकत, नजाकत कुरेशी बंधुंचा समावेश असून त्यांच्यावर बेकायदेशीरपणे जमीन हडपल्याप्रकरणी अनेक गुन्हे स्थानिक पोलिसांत दाखल आहेत. ६ एप्रिल रोजी या कुरेशी बंधुंसह सुमारे १५ ते २० साथीदारांनी ओबेल ढोल्या यांच्या मालकीच्या जागेत बेकायदेशीर कुंपण बांधण्यास सुरुवात केली होती. त्याचा जाब विचारणाऱ्या फिलोमीना ढोल्या (५५) व त्यांचा मुलगा डोसन (३५) यांना कुरेशी बंधुंसह त्यांच्या १५ ते २० साथीदारांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली. यातील डोसन जबर जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दोन्ही बाजुंकडून उत्तन-सागरी पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी कुरेशी बंधुंना अटक करून त्यांची त्वरीत जामिनावर मुक्तता केल्याने स्थानिकांत पोलिसांविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे. (प्रतिनिधी)