कुर्ल्यात नालेसफाई दरम्यान जमीन खचली, घरे-दुकाने जमीनदोस्त
By Admin | Updated: May 25, 2016 11:49 IST2016-05-25T11:49:36+5:302016-05-25T11:49:36+5:30
पावसाळयापूर्वी मुंबईत सर्वत्र नालेसफाईची कामे वेगाने सुरु असताना, बुधवारी कुर्ला शिवसृष्टी येथे नालेसफाई दरम्यान नाल्याजवळची जमीन खचल्याची घटना घडली.

कुर्ल्यात नालेसफाई दरम्यान जमीन खचली, घरे-दुकाने जमीनदोस्त
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - पावसाळयापूर्वी मुंबईत सर्वत्र नालेसफाईची कामे वेगाने सुरु असताना, बुधवारी कुर्ला शिवसृष्टी येथे नालेसफाई दरम्यान नाल्याजवळची जमीन खचल्याची घटना घडली. नाल्याजवळची जमीन खचल्यामुळे अनेक घरांचे आणि दुकानांचे नुकसान झाले आहे.
जवळपास २५ ते ३० घरे आणि दुकाने जमीनदोस्त झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.
सकाळी सहाच्या सुमारास घरे खचण्यास सुरुवात झाली. ज्या घरांचे आणि दुकानांचे नुकसान झाले ती नाल्याला खेटून बांधण्यात आली होती.