शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Shaktipeeth Highway: हुतात्म्यांच्या रक्ताने भिजलेली जमीन शक्तीपीठाला देणार नाही, शेती बचाव समितीचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:56 IST

२७ फेब्रुवारीला प्रांत कार्यालयावर मोर्चा

ईश्वरपूर : हुतात्म्यांच्या रक्ताने भिजलेली १ इंचही जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही, असा निर्धार करत शेती बचाव व संघर्ष समितीने प्रसंगी शक्तीपीठ महामार्गाला कानाबरोबर काठ्या काढून विरोध करू, असा इशारा केंद्र व राज्य शासनाला दिला. या महामार्गाला विरोध करण्यासाठी २७ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी वाळवा तालुक्यातील सर्व शेतकरी, परिवर्तनवादी व पुरोगामी संघटना, समविचारी पक्ष यांनी एकत्र येऊन शक्तीपीठ महामार्गविरोधी शेती बचाव संघर्ष समिती स्थापन केली आहे. या समितीमधील श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर, बळीराजाचे बी.जी. पाटील, विद्रोहीचे धनाजी गुरव, दिग्विजय पाटील, रणजीत चव्हाण, दलित महासंघाचे शंकर महापुरे, संभाजी ब्रिगेडचे अजित हवालदार, धरणग्रस्त संघटनेचे संतोष गोठणकर,दीपक कोठावळे यांनी पत्रकार परिषद घेतली. 

वाचा: शक्तिपीठ महामार्ग सातारा जिल्ह्यातील सोळा गावांतून जाणार, नवीन आराखड्याबाबत गोपनीयताडॉ. पाटणकर म्हणाले, शासनाने शक्तीपीठ महामार्ग आवश्यक आहे का याची खात्री करावी. महामार्ग निर्मितीत शेतकऱ्यांच्या विकासाचा कोणताही मुद्दा नाही. समृद्धी मार्ग हा अपघाती बळी घेणारा महामार्ग झाला आहे. शक्तीपीठ महामार्गाला आमचा तीव्र विरोध आहे.बी.जी. पाटील म्हणाले, देव आणि धर्माचा वापर करून निर्माण होणारा शक्तीपीठ मार्ग शेतकऱ्यांसाठी महासंकट आहे. जमिनी क्षारपड होणार आहेत. तालुक्यातील कृष्णा-वारणा नद्यांना मोठे पूर येण्याची भीती आहे. मागणी नसताना महामार्ग लादला तर तो आम्ही होऊ देणार नाही. गुरव म्हणाले, रस्ते निर्मितीला धार्मिक अधिष्ठान देऊन शेतकऱ्यांना भीती घातली जात आहे. वाळवा तालुक्याला उजाड करणारा हा महामार्ग ठरेल. त्यासाठी सगळे पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी आपली भूमिका जाहीर करावी.नाव देवाचे अन् भले कोणाचेशक्तीपीठ, भक्तीपीठ अशी नावे देत होणारे हे महामार्ग शेतकऱ्यांच्या कसल्याही उपयोगाचे नाहीत. त्यामुळे या देवांच्या नावाने होणाऱ्या महामार्गाच्या आडून उद्योगपतींची गावे वसवून त्यांचेच भले करण्याचा हा डाव आहे.नैसर्गिक संपर्क तुटणारवाळवा तालुक्यातून जाणारा हा महामार्ग सहापदरी आहे. त्यामुळे तो शेती किंवा गावे जोडणारा नाही. महामार्गात जाणाऱ्या जमिनीपेक्षा दोन्ही बाजूला पाणी साचून नापीक होणारी जमीन जास्त असेल. या मार्गामुळे गावे, शेती, वस्त्यांचा नैसर्गिक संपर्क तुटणार आहे.वाळवा तालुक्यातील गावे..!पलूस तालुक्यातून येणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची वाळवा तालुक्यातील मसूचीवाडी येथून सुरुवात होईल.त्यानंतर जुनेखेड,नवेखेड, बोरगाव,उरुण-ईश्वरपूर, वाळवा, येडेनिपाणी, कामेरी, येलूर, इटकरे, कुरळप, ऐतवडेबुद्रुक अशा गावातील जमिनी घेत पुढे कोल्हापूर जिल्ह्यातील पारगावकडे जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers vow to resist Shaktipeeth Highway, fearing land loss.

Web Summary : Farmers are strongly opposing the Shaktipeeth Highway, fearing land loss and environmental damage. They formed a Sheti Bachav Samiti to protest, planning a march against the project, concerned about its impact on agriculture and natural resources in the Walwa region.