लालूंनी केली उद्धव यांची प्रशंसा!

By Admin | Updated: June 17, 2016 03:01 IST2016-06-17T03:01:22+5:302016-06-17T03:01:22+5:30

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रशंसा करतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव जंटलमन

Lalu praised Uddhav Thackeray | लालूंनी केली उद्धव यांची प्रशंसा!

लालूंनी केली उद्धव यांची प्रशंसा!

मुंबई : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रशंसा करतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव जंटलमन असून आमचे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. मात्र, राज हे विघातक राजकारण करतात, अशी टीका त्यांनी केली.
सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकारांशी बोलताना लालूप्रसाद म्हणाले, उद्धव रुग्णालयात असताना मी त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याशी फोनवर बोललो होतो. पण राज ठाकरे बिहारी माणसांच्या विरोधात आहेत.
रा.स्व.संघापासून देशाला मुक्ती देण्याची गरज आहे, असे मत लालूप्रसाद यांनी व्यक्त केले. रा.स्व.संघ हा दलितविरोधी असून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा विरोधकदेखील आहे. आरक्षणाला त्यांचा विरोध आहे, असा आरोपही त्यांनी केला.
‘उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री अखिलेश यादव चांगला कारभार करीत आहेत आणि समाजवादी पार्टीच पुन्हा सत्तेत येईल. दोनच वर्षांत केंद्र सरकारच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. उद्योगांची निराशा झाली, महागाईने कळस गाठला, अशी टीकादेखील त्यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Lalu praised Uddhav Thackeray