शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लालपरीचे प्रवासी 29 लाखांवर; एसटीचे चाक येतेय रुळावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 09:52 IST

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. कोरोनामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एसटीसाठी एप्रिल  ते जून हा जास्त उत्पनाचा कालावधी असतो.  कोरोना पूर्व काळात दररोज ६५ लाख जण एसटीने प्रवास करीत होते. संपातून  कर्मचारी पुन्हा कामावर आल्यानंतर गाड्यांची संख्याही वाढत आहे, तसेच प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसटी प्रवासी संख्या २९ लाख पार गेली असून, उत्पन्न १७  कोटींपर्यंत गेले आहे. 

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. कोरोनामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर एसटीचे आर्थिक चाक पूर्वगतीवर येत असतानाच  ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपामुळे कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.   कोरोनापूर्व  काळात एसटीच्या १८ हजार गाड्या धावत होत्या. या गाड्यांच्या एक लाख फेऱ्या  होत होत्या. त्यातून  ६५ लाख  जण प्रवास करीत होते, तर २४  कोटींचे उत्पन्न मिळत होते. सध्या १३१४७ गाड्या सुरू असून,  त्यातून २८.६४ लाख जण प्रवास करीत आहेत, तर १६. ८३ कोटींचे  उत्पन्न  मिळत आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

९०६४६ कर्मचारी उपस्थित     एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांचा संप सुरू होता.     मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.     बुधवारपर्यंत ९०६४६ कर्मचारी उपस्थित झाले आहेत. 

टॅग्स :state transportएसटी