शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Lalit Patil Arrest: 'मी ससून मधून पळालो की मला पळवलं गेलं हे सगळं सांगणार,'- ललित पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 12:06 IST

Drugs Mafia Lalit Patil Arrest: संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या ड्रग्स प्रकरणातील माफिया ललित पाटील याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, ललित पाटिलला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले आहे. तिथे प्रसारमाध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, ललित पाटील याने धक्कादायक दावा केला आहे.

संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या ड्रग्स प्रकरणातील माफिया ललित पाटील याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, ललित पाटिलला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले आहे. तिथे प्रसारमाध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, ललित पाटील याने धक्कादायक दावा केला आहे. मी ससून रुग्णालयातून पळून गेलो नव्हतो, तर मला पळवण्यात आलं होतं. यामागे कुणाकुणाचा हात आहे, हे मी सगळं सांगणार आहे, असा दावा ललित पाटीलने केला आहे.

ड्रग रँकेट प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याचा भाऊ आणि मेफेड्राँन बनविणारा भूषण पाटील व अभिषेक बलकवडे या दोघांना पुणे पोलिसांनी १० ऑक्टोबरला नेपाळ बाँर्डरवर पकडले होते. तर फरार ललित पाटील याचा शोध घेण्यात येत होता. अखेर आज त्याच्या चेन्नई येथून मुसक्या आवळण्यात आला. ललित पाटील हा श्रीलंकेमध्ये पळण्याच्या तयारीत होता असा दावा करण्यात येत आहे.  दरम्यान, अटक करण्यात आल्यानंतर ललित पाटील याला मुंबईत आणण्यात आले आहे. तसेच रुग्णालयामध्ये त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी त्याला दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान, पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर ललित पाटील हा नाशिकला गेला होता. तिथे काही काळ राहिल्यानंतर तो इंदूरला गेला. तर तिथून गुजरातला गेला होता. त्याठिकाणाहून त्याने टूर्स आणि ट्रॅव्हल्स गाडी भाड्याने घेतली. त्या गाडीने तो कर्नाटकात गेला. यादरम्यान, त्याने महाराष्ट्रातून प्रवास केला. त्यानंतर तो चेन्नईला पोहचला. नाशिकमध्ये मुंबई पोलिसांनी कारवाई केली तेव्हा ललित पाटीलच्या एका निकटवर्तीयाला अटक करण्यात आली होती. परंतु याची कुठलीही खबर माध्यमांना लागून दिली नाही. पोलिसांच्या अटकेत असलेल्या या आरोपीलाच ललित पाटीलचा फोन आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी व्यक्तीला ललित पाटीलशी बोलायला सांगितले. त्यानंतर ललितने कशारितीने तो फरार झाला, कुठून कसा गेला हे सांगितले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी पाठलाग करून ललित पाटीलला चेन्नईतून अटक केली.

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी