लाल दिव्याविना पवार येणार
By Admin | Updated: November 16, 2014 00:52 IST2014-11-16T00:52:39+5:302014-11-16T00:52:39+5:30
महापालिकेत 15 वर्षापासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच सरकारी वाहने, सरकारी बाबू अशा लवाजम्याशिवाय शहरात येत आहेत.
लाल दिव्याविना पवार येणार
पिंपरी : महापालिकेत 15 वर्षापासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच सरकारी वाहने, सरकारी बाबू अशा लवाजम्याशिवाय शहरात येत आहेत. स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने रविवारी 16 नोव्हेंबरला ते आमदार म्हणुन पिंपरी चिंचवड महापालिकेत बैठकीसाठी येणार आहेत. या बैठकीत डेंगीचा आढावा घेण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले स्वच्छ भारत अभियानाअंतगर्ंत पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सहकायार्ने राबविण्यात येणार आहे. सकाळी स्वच्छता मोहिम होणार आहे. यामध्ये हजारो स्वयंसेवकांमार्फत महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यलयामध्ये विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौकापासून सकाळी पावणोसात वाजता या अभियानाला सुरूवात होणार आहे. स्वच्छता अभियानात पवार स्वत: सहभागी होणार आहेत.दुपारी 1.45 वाजता पवार यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त राजीव जाधव, पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासनाचे अधिकारी यांची डेंग्यूबाबत बैठक होणार आहे. डेंग्यूच्या उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.
उपमुख्यमंत्रीपद नाही, लाल दिव्याचे वाहन नाही, अशा स्थितीत आतार्पयत कार्यकत्र्याच्या गराडय़ात वावरणा:या पवार यांचा हा दौरा कसा असेल? समवेत अन्य कोणी मंत्री नाहीत, शासनाकडून नियुक्त केलेले स्वीय सहायक नाहीत. राज्यात, केंद्रात भाजपचे सरकार आल्यामुळे बदलेली राजकीय स्थिती अशा वातावरणात पवार यांच्या या शहर दौ:याबद्दल उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)
4एरवी दौ:याबद्दल विचारणा करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी माजी उपमुखयमंत्री पवार यांच्या स्वीय सहायकाशी चर्चा करायचे, प्रत्येक वेळी थेट त्यांच्याशी बोलण्यापेक्षा स्वीय सहायकांशी संपर्क साधायचे, आता स्वीय सहायक नसल्याने त्यांची पंचायत झाली आहे. रविवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशी हा दौरा असल्याने महापालिकेतील अधिकारी,कर्मचा:यांनीही सुटीच्या दिवशी महापालिकेत यावे लागणार याबद्दल नाराजी व्यक्त केली. मंत्रीपदावर असताना, शिष्टाचार म्हणुन सुटीच्या दिवशी बैठकीस येण्यास अधिकारी आढेवेढे घेत नव्हते. परंतू आता सुटीच्या दिवशी होणा:या बैठकीला हजर रहाण्यास आढेवेढे घेत आहेत.