शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

लक्ष्मीपूजनासाठी सूर्यास्तानंतरचे अडीच तास सर्वोत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 03:33 IST

लक्ष्मीपूजनासाठी उद्या (गुरुवारी) दुपारी ४.४५ ते ८.४०, रात्री ९.३५ ते ११.५५ हा चांगला तर सूर्यास्तानंतरचा अडीच तासांचा मुहूर्त सर्वोत्तम आहे.

पुणे : लक्ष्मीपूजनासाठी उद्या (गुरुवारी) दुपारी ४.४५ ते ८.४०, रात्री ९.३५ ते ११.५५ हा चांगला तर सूर्यास्तानंतरचा अडीच तासांचा मुहूर्त सर्वोत्तम आहे. या कालावधीत व्यापारी वर्गासह घरोघरी कुबेराचे पूजन करावे, असे आवाहन दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी केले आहे.आश्विन वद्य अमावास्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, आॅफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातील सोनंनाणं-रोकड यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांचे पूजन करतो. या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्यलक्ष्मी (केरसुणी) हिचीपण पूजा केली जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला जातो. लक्ष्मीपूजनासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी बुधवारी सायंकाळी बाजारपेठेत गर्दी झाली होती. झेंडूची फुले, केरसुणी, लाही बत्तासे यांची खरेदी करताना महिला दिसत होत्या. यादिवशी गोडधोड करण्याची प्रथा असल्याने मिठाईच्या दुकानाबाहेर रांगा होत्या.लक्ष्मीपूजन मुहुर्त :- आज दुपारी ४.४५ ते ८.४०- रात्री ९.३५ ते ११.५५

टॅग्स :diwaliदिवाळीDeepotsav 2017दीपोत्सव 2017Maharashtraमहाराष्ट्र