बेरोजगार युवकांना लाखोंचा चुना, मंत्रालयीन बडा बाबू पसार

By Admin | Updated: May 7, 2014 21:49 IST2014-05-07T20:35:33+5:302014-05-07T21:49:13+5:30

बेरोजगार युवकांना लाखो रु पयांचा चुना लावणारा मंत्रालयातील बडा बाबू फरार झाला

Lakhs of unemployed youth have been selected; | बेरोजगार युवकांना लाखोंचा चुना, मंत्रालयीन बडा बाबू पसार

बेरोजगार युवकांना लाखोंचा चुना, मंत्रालयीन बडा बाबू पसार

भातसानगर - सरकारी नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने बेरोजगार युवकांना लाखो रु पयांचा चुना लावणारा मंत्रालयातील बडा बाबू फरार झाला असून त्याचा अन्य एक सहकारी प्रकाश पाठक आणि मध्यस्थाची भूमिका बजावणारा संतोष गायकर यांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी असल्याचे सांगत मंत्रालयातील तत्कालीन वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पलटवार या अधिकार्‍याने आपला सहकारी प्रकाश पाठक याच्या मदतीने आणि मुरबाडमधील संतोष गायकर याच्या साहाय्याने अनेक बेरोजगार युवकांकडून लाखो रु पयांची रक्कम जमा केली़ प्रत्यक्षात एकालाही नोकरी लागली नाही. त्यामुळे आपली फसगत झाल्याचे लक्षात आलेल्या या युवकांनी आपले पैसे परत करण्याचा तगादा लावल्याने पलटवार याने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बांद्रा शाखेचा ९८ हजार रु पयांचा तर प्रकाश पाठक याने ५१ लाख रु पयांचा कर्नाळा बँकेच्या उरण शाखेचा धनादेश संतोष गायकर याला दिला. मात्र, दोन्ही धनादेश वटले नाहीत. त्यामुळे गरजू बेरोजगार युवकांना नोकरी लावण्याचे हे प्रकरण गायकर याच्या चांगलेच अंगाशी आले़ मंत्रालयीन बड्या बाबूकडून मिळालेले धनादेश न वटल्याने गायकर याचीही फसगत झाली . या प्रकरणी शहापूर पोलिसात तक्र ार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गायकर आणि पाठक या दोघांना अटक केली असून अधिक तपास चालू आहे.

 

Web Title: Lakhs of unemployed youth have been selected;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.