कोपर्डीतील आरोपीला ठार मारणा-यास देणार लाख रुपयांचे बक्षिस
By Admin | Updated: July 21, 2016 13:52 IST2016-07-21T13:52:09+5:302016-07-21T13:52:09+5:30
कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करणा-या बेपत्ता आरोपीना जिवंत पकडणा-यास पन्नास हजारांचे बक्षीस जाहीर.

कोपर्डीतील आरोपीला ठार मारणा-यास देणार लाख रुपयांचे बक्षिस
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. २१ - कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करुन तिची हत्या करणा-या बेपत्ता आरोपीना जिवंत पकडणा-यास पन्नास हजार तर ठार मारणा-या एक लाख रुपयांचे बक्षीस पंढरपूर राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यानी घोषीत केले.कोपर्डीतील घटनेच्या निषेधार्थ आज पंढरपूरात उत्स्फुर्त बंद करण्यात आला व जोरदार निदर्शने करण्यात आली त्यावेळी मांडवे यानी ही घोषणा केली.