महिलेस पावणेतीन लाखांचा गंडा

By Admin | Updated: May 16, 2016 02:58 IST2016-05-16T02:58:38+5:302016-05-16T02:58:38+5:30

एका महिलेस दोन लाख ७० हजारांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

Lakhs of millions of women | महिलेस पावणेतीन लाखांचा गंडा

महिलेस पावणेतीन लाखांचा गंडा

काल्हेर : पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने नवशाद मोमीन याने एका महिलेस दोन लाख ७० हजारांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मोमीन याने फरिदा मुल्ला अनम शहा यांना दागिने व पैसे हिरा गोल्ड कंपनीत दुप्पट करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार, शहा यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये त्याला दागिने आणि दोन लाख ४० हजार रुपये दिले, परंतु ऐवज परत न मिळाल्याने शहा यांनी गुरुवारी सायंकाळी पोलिसात तक्रार दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Lakhs of millions of women