शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार?; एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 18:43 IST

Ladki Bahin Yojana: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या वतीने भूमिका मांडली आहे.

Eknath Shinde: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नव्या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात राज्यातील लाडक्या बहि‍णींना प्रतिमहा २१०० रुपये देण्याबाबतची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु सरकारने तूर्तास तरी हा निर्णय घेणं टाळलं आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वाढीव रक्कम कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या वतीने भूमिका मांडली आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात सांगितलं आहे की, सरकारने कोणतीही योजना बंद केलेली नाही. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गतही सध्या दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर आम्ही ही रक्कम वाढवून २१०० रुपये देऊ," असं शिंदे यांनी आश्वस्त केलं आहे.

दरम्यान, "महाराष्ट्र हे देशात एक नंबरचं राज्य आहे. जीडीपी, एफडीआय या सगळ्यांत आपण एक नंबरला आहोत. राज्यात मोठ्या प्रमाणात इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहेत. रेल्वे कनेक्टिव्हिटी, एअर कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटीसाठी काम सुरू आहे. नीती आयोगाने सांगितलंय की, फक्त एमएमआर परिसरात १.५ ट्रिलियन इकॉनॉमिची क्षमता आहे. त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था आणखी सुधारणार असून आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू," असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAjit Pawarअजित पवार