शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 16:35 IST

Eknath Shinde And Narendra Modi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही" असं म्हटलं आहे.

बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे उभारण्यात आलेल्या 'बंजारा विरासत' या म्युझियमचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. "लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही" असं म्हटलं आहे. तसेच "मोदीजी महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, नुसतं भाषण देऊन जात नाहीत. ते भरभरून देऊन जातात" असं म्हणत पंतप्रधानांचं भरभरून कौतुक केलं आहे. 

"बंजारा विरासतचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झालं आहे. सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा हा दिवस आहे. तुम्ही भाग्यवान आहात. रामराव महाराजांनी इच्छा व्यक्त केली होती, की पंतप्रधानांनी पोहरादेवीला यावं. पण तो योग इतर कोणाच्या नशिबात आला नाही. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नशिबात तो योग होता."

"बंजारा समाजाचा इतिहास जपण्याचं काम आपल्याला करायचं आहे. भारताला महाशक्ती बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही कारण मोदींजीचा प्रभाव तेवढा वाढत आहे. मोदीजी देशाची शान आहेत. मोदीजींच्या प्रेरणेने, आशीर्वादाने राज्याच्या विकासाला स्पीड आला आहे. गती आली आहे. डबल इंजिन सरकारचं काम विकासाच्या बुलेटच्या वेगाने पुढे जात आहे. ऐतिहासिक कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे."

"मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलेली आहे. दोन कोटींहून जास्त असलेल्या आमच्या बहिणींच्या खात्यात तीन हप्ते जात आहेत. विरोधक म्हणतात आम्ही ही योजना बंद करू परंतु कोणीही लाडकी बहीण योजना कधीच बंद करू शकणार नाही. कारण ही योजना आमच्या गोरगरीब बहिणींसाठी आहे. डबल इंजिन सरकार सर्वांना न्याय देण्याचं काम करत आहे. आपलं सरकार हे त्यामुळेच लाडकं सरकार झालं आहे."

"मोदीजी महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, नुसतं भाषण देऊन जात नाहीत. ते भरभरून देऊन जातात. ते आमच्याकडून काम करून घेतात आणि पाठीवर शाबासकीची थापही देऊन जातात. हा त्यांचा मोठेपणा आहे. परंतू त्यानंतरही विरोधक टीका करत राहतात. मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मोठा इतिहास आहे. नवनवीन निर्णय, कामं ही मोदीजींच्या काळात होतात" असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणwashimवाशिम