निधीची कमतरता भासू देणार नाही - मुनगंटीवार
By Admin | Updated: October 9, 2015 03:30 IST2015-10-09T03:30:52+5:302015-10-09T03:30:52+5:30
एशियाटिक ग्रंथालयाच्या डिजीटायझेशनसाठी अर्थसंकल्पात पाच कोटी रु. निधी चिन्हांकित केला आहे. एशियाटिक ग्रंथालयातील ग्रंथसंपदा हा महाराष्ट्राच्या संपन्न संस्कृतीचा

निधीची कमतरता भासू देणार नाही - मुनगंटीवार
मुंबई : एशियाटिक ग्रंथालयाच्या डिजीटायझेशनसाठी अर्थसंकल्पात पाच कोटी रु. निधी चिन्हांकित केला आहे. एशियाटिक ग्रंथालयातील ग्रंथसंपदा हा महाराष्ट्राच्या संपन्न संस्कृतीचा दुर्मीळ दस्तावेज आहे. या ग्रंथ संपदेची जपणूक करण्यासाठी व या ग्रंथालयाचे वैभव अबाधित राखण्यासाठी आम्ही निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी मुंबईतील एशियाटिक ग्रंथालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी ग्रंथालयातील ग्रंथसंपदेचे निरीक्षण केले. ग्रंथालयातील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. यावेळी एशियाटिक ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथालय, डिजीटायझेशन तसेच संग्रहालय याविषयीचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार, एस. बी. काळे यांच्यासह एशियाटिक ग्रंथालयाशी संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)