कुंडेश्वर धबधब्यात ठाण्याचा तरुण बुडाला

By Admin | Updated: July 20, 2014 02:23 IST2014-07-20T02:23:29+5:302014-07-20T02:23:29+5:30

येथून जवळच असलेल्या कुंडेश्वर या पर्यटनस्थळावर पावसाळी सहलीसाठी आलेल्या ठाण्यातील सहा तरुणांपैकी एक तरुण पाण्यात बुडाला. दोन तासानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

In the Kundeshwar waterfalls, the young man lost his place | कुंडेश्वर धबधब्यात ठाण्याचा तरुण बुडाला

कुंडेश्वर धबधब्यात ठाण्याचा तरुण बुडाला

बदलापूर : येथून जवळच असलेल्या कुंडेश्वर या पर्यटनस्थळावर पावसाळी सहलीसाठी आलेल्या ठाण्यातील सहा तरुणांपैकी एक तरुण पाण्यात बुडाला. दोन तासानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
ठाणो येथील वागळे इस्टेट परिसरात राहणारा श्याम दिनेश श्यामसुंदर (23) हा आपल्या पाच मित्रंसोबत कुंडेश्वर धबधब्यावर आला होता. धबधब्याच्या वरच्या खडकावरून पाण्यात उडी मारताना तो पाण्याखालील कपारीत अडकला. उडी मारल्यावर आपला मित्र पाण्याबाहेर न आल्याने त्याच्या मित्रंनी बचावासाठी आरडाओरडा केला. 
मात्र, मदत न मिळाल्याने श्याम पाण्यातील कपारीतच अडकून पडला. अखेर, अग्निशमन विभागाला मदतीसाठी बोलवण्यात आले. अग्निशमन विभागाने दोन तास शोध घेतल्यावर त्याचा मृतदेह सापडला. या आधीही धबधब्यावर अनेक जण पाण्यात उडय़ा मारताना मृत पावले आहेत. (प्रतिनिधी)
 

 

Web Title: In the Kundeshwar waterfalls, the young man lost his place