सिंहस्थसाठी कुळकर्णी समिती
By Admin | Updated: February 10, 2015 02:19 IST2015-02-10T02:19:41+5:302015-02-10T02:19:41+5:30
नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे आगामी वर्षभरात होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे जलदगतीने आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी

सिंहस्थसाठी कुळकर्णी समिती
मुंबई : नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे आगामी वर्षभरात होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे जलदगतीने आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आनंद कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.
समितीमध्ये नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, पोलीस गृहनिर्माणचे व्यवस्थापकीय संचालक अरुप पटनाईक, राजमाता जिजाऊ अभियानच्या वंदना कृष्णा, रोजगार-स्वयंरोजगार विभागाचे आयुक्त विजयकुमार गौतम, नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर, नाशिकचे विभागीय, पोलीस व महापालिका आयुक्त आदींचा सदस्यांमध्ये समावेश आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहायक रामेश्वर नाईक हे समितीचे समन्वय सहायक असतील. (विशेष प्रतिनिधी)