शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

कोयना विद्युत निर्मितीचा वीज पुरवठ्यावर परिणाम नाही : महावितरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 07:00 IST

पाण्याअभावी कोयनेची चौथ्या टप्प्यातील विद्युत निर्मिती पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे

ठळक मुद्देपाण्याअभावी १८२० मेगा वॅट वीज निर्मिती बंदकडाक्याच्या उन्हामुळे महावितरणकडे दररोज १९ ते १९,५०० मेगावॅट विजेची मागणी राज्यात कोठेही भारनियमन होणार नसल्याचे महावितरणने केले स्पष्ट  

पुणे : पाण्याअभावी कोयनेची चौथ्या टप्प्यातील विद्युत निर्मिती पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. कोयनेतील १ हजार ८२० मेगावॅट विद्युत निर्मिती ठप्प होणार असली तरी, राज्यातील विद्युत पुरवठ्यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. मागणीप्रमाणे वीज उपलब्ध करुन दिली जाईल, असे महावितरणने स्पष्ट केले.  कडाक्याच्या उन्हामुळे महावितरणकडे दररोज १९ ते १९,५०० मेगावॅट विजेची मागणी आहे. महावितरणकडे झीरो शेड्यूलमध्ये असलेले परळी औष्णिक प्रकल्पामधील संच ६, ७ व एनटीपीसी सोलापूर या औष्णिक प्रकल्पाचा वाटा मिळून एकूण १,१४४ मेगावॅट इतकी अतिरिक्त वीज उपलब्ध आहे. तसेच पॉवर एक्सचेंजवर वीज उपलब्ध असल्यामुळे आणि मागणी एवढी विजेची उपलब्धता असल्याने कोयनेच्या वीजनिर्मिती केंद्रामधील टप्पा क्रमांक ४ मधून विज निर्मिती पुर्णपणे बंद झाली तरीही राज्यात कोठेही भारनियमन होणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले. कोयना धरणात बुधवार (दि. ५) अखेरीस ९.७६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. येत्या १५ जुलैपर्यंत हा पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. त्यामुळे २९ मे पासून येथील टप्पा क्रमांक ४मधून वीज निर्मिती बंद केली आहे. चिपळूण आणि दाभोळ परिसरास पाणी पुरवठा करण्यासाठी टप्पा क्रमांक १, २ व ३ मधून कमी दाबाने वीज निर्मिती करण्यात येत आहे. महावितरण कंपनीने महाजनको, एनटीपीसी, एनपीसीआयएल, स्वतंत्र वीज प्रकल्प व नवीकरणीय स्त्रोत यांचे सोबत दीर्घकालीन वीज खरेदी करार केलेले आहेत. तसेच, विजेची मागणी वाढल्यास किंवा काही कारणास्तव चालू असलेल्या प्रकल्पांमधून वीज निर्मिती कमी झाल्यास महावितरण कंपनीतर्फे झीरो शेड्यूल्डामध्ये असलेले संच किंवा पॉवर एक्सचेंजवर वीज खरेदी करुन विजेच्या उपलब्धतेत वाढ करण्यात येईल. मात्र, कोयनेतील विद्युत निर्मिती बंद झाल्याचा परिणाम राज्यातील विज पुरवठ्यावर होणार नाही, असे महावितरणने सांगितले.--कोयना जलविद्युत प्रकल्पामधून १ हजार ९६० मेगावॅट विद्युत निर्मिती होते. त्यातील १ हजार ८२० मेगा वॅट विद्युत निर्मिती बंद आहे. या प्रकल्पातील ६०० मेगावॅट क्षमतेचे १ व २ टप्पा चोवीस तास चालवून त्यातून ४० मेगा वॅट आणि ३२० मेगावॅट क्षमतेच्या टप्पा क्रमांक ३ प्रकल्पातून ८० मेगावॅट विजेची निर्मिती केली जाणार आहे. तर, चौथा टप्पा बंद ठेवण्यात येईल. 

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणKoyana Damकोयना धरण