शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

कोरेगाव भीमा दंगल पूर्वनियोजित, पोलिसांचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 14:04 IST

कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल पूर्वनियोजित असून त्यासाठी सवर्ण समाजातील काही गट अनेक दिवसांपासून तयारी करत होते. घटनेच्या दिवशी गावातील सर्व दुकाने बंद ठेवून बाहेरून हजारोंच्या संख्येने येणा-यांना कसलीही मदत करावयाची नाही, इथपर्यंतच्या बाबींचे नियोजन करण्यात आल्याची माहिती अतिवरिष्ठ अधिका-यांनी केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाली आहे.

- जमीर काझीमुंबई  - कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल पूर्वनियोजित असून त्यासाठी सवर्ण समाजातील काही गट अनेक दिवसांपासून तयारी करत होते. घटनेच्या दिवशी गावातील सर्व दुकाने बंद ठेवून बाहेरून हजारोंच्या संख्येने येणा-यांना कसलीही मदत करावयाची नाही, इथपर्यंतच्या बाबींचे नियोजन करण्यात आल्याची माहिती अतिवरिष्ठ अधिकाºयांनी केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाली आहे. त्याचप्रमाणे ३१ डिसेंबरला पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतील चिथावणीखोर भाषणांमुळेही दोन्ही समाजांमध्ये अधिक कटुता निर्माण झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. गुरुवारी त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला.कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाला अभिवादनासाठी देशभरातून आलेल्या आंबेडकर अनुयायांवर दगडफेक करून वाहनांची मोडतोड करण्यात आली. या दंगलीचे गांभीर्य लक्षात घेऊन महासंचालक दर्जाच्या अधिका-यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यात राज्य गुप्तवार्ता विभागाच्याही वरिष्ठ अधिकाºयांचा समावेश होता. या अधिका-यांनी घेतलेल्या माहितीत गेल्या काही वर्षांपासून १ जानेवारीला विजयस्तंभाला अभिवादनासाठी येणाºयांच्या संख्येत वाढ होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये काहीशी नाराजी होती. कट्टरवादाचा पुरस्कार करणाºया एका गटाकडून त्याबाबत आणखी गैरसमज पसरविण्यात आले. अस्वच्छता पसरविणे, हुल्लडबाजीमुळे स्थानिक भागात सवर्ण समाजातील मुले, महिलांची सुरक्षितता धोक्यात येणे, अशी कारणमीमांसा या गटाकडून करण्यात येत होती.यंदा विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्याने लाखोंच्या संख्येत येणाºयांना धडा शिकविलाच पाहिजे, असा प्रचार या गटाकडून भूमिगतरीत्या करण्यात येत होता. त्यासाठी १ जानेवारीला गावातील कोणतेही दुकान, स्टॉल उघडायचे नाही, येणाºयांना मदत होता कामा नये, यासाठी कट्टरवाद्यांनी व्यापारी व दुकानदारांना तशा सूचना दिल्या होत्या, असे पोलिसांच्या अहवालात नमूद आहे. बाहेरून मोठ्या प्रमाणात वाहने आणल्याने ती फोडण्याचे आधीच ठरविण्यात आले होते. २९ व ३० डिसेंबरला संंभाजी महाराजांच्या स्मृतिस्थळाला अभिवादनासाठी आलेला जमाव गावातून बाहेर गेलाच नाही. १ जानेवारीसाठी ते गावातच विविध ठिकाणी गटागटाने थांबून होते.आंबेडकर अनुयायांना विजयस्तंभावर जाण्यापासून रोखल्यानंतर त्यांचा राग अनावर झाला, त्याचवेळी या समाजकंटकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. त्यांना थोपविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. तथापि, त्यांच्या तुलनेत पोलिसांची संख्या मर्यादित असल्याने तो आटोक्यात आणण्यात अपयश आल्याचे अहवालात नमूद केले आहे.जिग्नेशच्या भाषणाचा परिणामगुजरातचा तरुण दलित नेता जिग्नेश मेवानी याने ३१ डिसेंबरला पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत नव्या पेशवाईविरुद्ध लढा पुकारण्याची घोषणा केली होती. त्यामुळे दलित समाज उत्साहित झाला तर कट्टर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. त्यामुळे ही ठिणगी दंगलीला कारणीभूत ठरल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांचे मत आहे.सुुवेझ हक यांची बदली?१ जानेवारीला विजयस्तंभाच्या ठिकाणी जाण्यास दलितांना अटकाव करणाºया हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना तेथे जाण्यास निर्बंध घालण्याची आवश्यकता होती. मात्र पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी तो निर्णय घेतला नाही. त्यामुळे पुढील अनर्थ घडल्याचे अधिकाºयांचे मत आहे.या दंगलीचे पडसाद महाराष्टÑाच्या कानाकोपºयाबरोबरच परराज्यातही उमटत असल्याने त्यांची या ठिकाणाहून बदली केली जाण्याची शक्यता आहे.जिग्नेश, उमरला भाषणबंदीसध्या राज्यात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत. त्यामुळे चिथावणीखोर, दुही पसरविणाºया प्रत्येक व्यक्ती, संघटनेवर कडक कारवाई केली जाईल. त्यामुळे परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी, विद्यार्थी नेता उमर खलिद यांना भाषणाला परवानगी देण्यात येणार नाही.- सतीश माथूर,पोलीस महासंचालक

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणे