शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा प्रकरण : ‘एल्गार’मधील भाषणांमुळे दंगल भडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 05:44 IST

पुण्यात आयोजित केलेल्या एल्गार परिषदेतील भाषणे जनसमुदायात प्रक्षोभ वाढविणारी होती. त्याची परिणती कोरेगाव भीमा हिंसाचारात झाल्याचे प्रतिज्ञापत्र पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांनी चौकशी आयोगाकडे शुक्रवारी सादर केले.

मुंबई  - पुण्यात आयोजित केलेल्या एल्गार परिषदेतील भाषणे जनसमुदायात प्रक्षोभ वाढविणारी होती. त्याची परिणती कोरेगाव भीमा हिंसाचारात झाल्याचे प्रतिज्ञापत्र पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांनी चौकशी आयोगाकडे शुक्रवारी सादर केले.कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने चौकशीसाठी अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रवींद्र सानेगांवकर (पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर) यांनी चौकशी आयोगात प्रतिज्ञापत्र सादर केले. सुरुवातीला या हिंसाचाराला समता हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना जबाबदार ठरवून, त्यांच्यावर गुन्हा नोंदविणाºया पुणे पोलिसांनी भूमिकेत बदल करत, आता घटनेला एल्गार परिषदेतील प्रक्षोभक भाषणांना जबाबदार ठरविले आहे.देशात घटनेद्वारे प्रस्थापित लोकशाही शासन व्यवस्था हिंसेच्या जोरावर उलथवून टाकण्यासाठी देशव्यापी मोठे कट कारस्थान माओवादी संघटनेने आखले आहे. त्यांनी आखलेल्या पूर्वनियोजित कटाच्या अनुषंगाने या गुन्ह्यातील आरोपींचे कामकाज सुरू आहे. या संघटनेने व संघटनेच्या काही सदस्यांनी सदर गुन्ह्याचा कट केल्याचे दिसून येते आणि एल्गार परिषदेचे आयोजन म्हणजे, या कटाचाच एक भाग आहे, असे सानेगांवकर यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.बंदोबस्तासाठी पुरेसे पोलीसबळ होतेएल्गार परिषदेमधील वक्त्यांची भाषणे, वक्तव्य व इतर कार्यक्रम आक्षेपार्ह, भडक व प्रक्षोभक होते. त्यामुळे कायदा व सुव्यस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले, असेही प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. कोरेगाव भीमामध्ये बंदोबस्तासाठी पुरेसे पोलीसबळ उपस्थित नव्हते, असे साक्षीदारांनी आयोगापुढे सांगितले. त्यांचा हा आरोप पोलिसांनी फेटाळला.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPoliceपोलिस