राणेंच्या भूमिकेकडे कोकणाचे लक्ष
By Admin | Updated: July 18, 2014 02:27 IST2014-07-18T02:27:44+5:302014-07-18T02:27:44+5:30
येत्या तीन दिवसांत कोकण दौरा करून ते मोठा निर्णय घेणार असल्याच्या वृत्ताने सिंधुदुर्गसह राज्यातील राजकारण गुरुवारी ढवळून निघाले आहे

राणेंच्या भूमिकेकडे कोकणाचे लक्ष
महेश सरनाईक, कणकवली
येत्या तीन दिवसांत कोकण दौरा करून ते मोठा निर्णय घेणार असल्याच्या वृत्ताने सिंधुदुर्गसह राज्यातील राजकारण गुरुवारी ढवळून निघाले आहे. राणे आता कोणता निर्णय घेतात याकडे आता कोकणवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
लोकसभा निवडणुकीत पुत्र नीलेश यांच्या पराभवानंतर नारायण राणे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊ केला होता. त्यानंतर ते नाराज असल्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या बातम्या वारंवार येत होत्या. राणे यांनी पक्षश्रेष्ठींची दिल्लीत भेट घेतल्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय राहण्याचे संकेत देत कामाला सुरूवात केली होती.
गेल्या दहा वर्षात कायमच राणे यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असायचे. मात्र, प्रत्येकवेळी राणेंच्या महत्त्वाकांक्षेकडे पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष केल्याचे राणे यांनी वारंवार बोलूनही दाखविले आहे.
शुक्रवारपासून राणे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तर २0 जुलैला कणकवली येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्नेहसंमेलन होणार असून यावेळी राणे कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत.