पावसाळ्यात कोकण रेल्वेचा वेग मंदावणार
By Admin | Updated: May 24, 2016 03:17 IST2016-05-24T03:17:57+5:302016-05-24T03:17:57+5:30
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. सुरक्षिततेचे सर्व उपाय योजतानाच कोलाड ते ठोकूरदरम्यान ९५० कर्मचाऱ्यांची गस्त राहणार असल्याची
पावसाळ्यात कोकण रेल्वेचा वेग मंदावणार
मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. सुरक्षिततेचे सर्व उपाय योजतानाच कोलाड ते ठोकूरदरम्यान ९५० कर्मचाऱ्यांची गस्त राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. त्याचप्रमाणे मुसळधार पाऊस असल्यास ताशी ४० किमी वेगाने ट्रेन चालविण्याचे निर्देशही इंजिनचालकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या ट्रेनचा वेग मंदावणार आहे. पावसाळ्यात दरड कोसळणे, माती खचणे, पाणी साचणे असे प्रकार होऊन कोकण रेल्वे वारंवार विस्कळीत होते. पोमेंडी, निवसर, अडवलीसारखी ठिकाणे तर कोकण रेल्वेसाठी डोकेदुखीच ठरलेली आहेत. या ठिकाणी सुरक्षेचे उपाय केल्यानंतरही दरड कोसळण्याच्या घटना घडतात. मात्र गेल्या चार वर्षांत दरड कोसळूनही कोकण रेल्वे विस्कळीत झालेली नाही, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. गेल्या वर्षी पावसाळ्यात ४00 कर्मचारी कोकण रेल्वेमार्गावर तैनात होते. यंदा ९५0 कर्मचाऱ्यांची गस्त राहणार आहे. गस्त घालतानाच काही मार्गांवर २४ तास वॉचमनही ठेवण्यात येतील. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ हालचालींसाठी सर्व महत्त्वाच्या ठिकाणी बी. आर. एन.चे एस्कॅव्हेटर तयार ठेवण्यात आल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले. प्रवाशांच्या सोयीसाठी बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे २४ तास नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले आहेत. प्रवासी ६६६.‘ङ्मल्ल‘ंल्ल१ं्र’६ं८.ूङ्मे किंवा १३९ डायल करून तसेच कोकण रेल्वेच्या १८00२३३१३३२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ट्रेनच्या स्थितीची माहिती घेऊ शकतात. पावसाळ्यात रात्रीच्या वेळेत कोकण रेल्वेवरून चालणाऱ्या गाड्यांचे अधिकारी आणि पर्यवेक्षकांद्वारे फुटप्लेट निरीक्षणही करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) आपत्कालीन उपाययोजना एखादी दुर्घटना झाल्यास अॅक्सिडंट रिलिफ मेडिकल व्हॅन, मेडिकल व्हॅन तैनात ठेवण्यात येईल. लोको पायलट, स्टेशन मास्तर, फिल्ड अधिकाऱ्यांना मोबाइल फोन देण्यात आले आहेत. लोको पायलट आणि गार्ड यांना वॉकीटॉकी देण्यात आले आहेत. १0 जून ते ३१ आॅक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू राहील.