कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार
By Admin | Updated: July 21, 2015 01:01 IST2015-07-21T01:01:24+5:302015-07-21T01:01:24+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेला पाऊस राज्याच्या अनेक भागात परतला आहे. गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेला पाऊस राज्याच्या अनेक भागात परतला आहे. गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला तर अनेक ठिकाणी त्याने हजेरी लावली. मराठवाडा मात्र कोरडाच राहिला. तेथे कोठेही पाऊस पडल्याची नोंद झाली नाही.
मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांवर आणि अरबी समुद्रात किनारपट्टीवर हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रीय असल्याने मॉन्सून राज्यात सक्रीय झाला आहे. परिणामी राज्यात मराठवाडा वगळता सर्वदूर पाऊस पडू लागला आहे. गेल्या २४ तासांत महाबळेश्वर आणि विदर्भातील पेरसेओणी येथे प्रत्येकी ९० मिमी पावसाची नोंद झाली.
त्यापाठोपाठ सुरगाणा, इतगपुरी येथे ७०, रामटेक, सावनेर येथे ६०, भिरा, गगनबावडा, चिखलदरा येथे ५०, वेंगुर्ला, कर्जत, माथेरान, सडक अर्जुनी येथे ४०, सावंतवाडी, कणकवली, देसाईगंज, गडचिरोली, सालेकसा, ब्रम्हपुरी, चार्मोशी, आमगाव येथे ३०, कुडाळ, पाली, तळा, राजापूर, मालवण, संगमेश्वर, दापोली, चंदगड, पुणे-वेल्हा, पुणे-मुळशी, पुणे-भोर, ओझरखेडा, दिंडोरी, भद्रावती येथे २०, रोहा, शहापूर, ठाणे, पोलादपूर, भिवंडी, चिपळूण, उल्हासनगर, रत्नागिरी, गुहाघर, शाहूवाडी, राधानगरी, एटापल्ली, चंद्रपूर, भंडारा येथे १० मिमी पावसाची नोंद झाली.
घाटमाथ्यांवरही मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांत ताम्हिणी, शिरगाव घाटांमध्ये ९० मिमी, दावडी घाटात ७०, डुंगरवाडी, अम्बोणे, भिरा, लोणावळा घाटात ५०, कोयना, वळवण, शिरोटा घाटात ४०, खोपोली, ठाकूरवाडी घाटात ३० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. राज्यात अशी स्थिती असताना मराठवाडा मात्र अजूनही कोरडाच आहे. तेथे दुष्काळाचे सावट पडू लागले आहे.