कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक, ठाण्यात 34 टक्के मतदान
By Admin | Updated: February 3, 2017 14:45 IST2017-02-03T13:04:45+5:302017-02-03T14:45:49+5:30
विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात मतदानाला सुरूवात झाली आहे.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक, ठाण्यात 34 टक्के मतदान
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 3 -विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यात 21 मतदान केंद्रांत दुपारी 12 वाजेपर्यंत 34.34 टक्के मतदान झाले. या निवडणुकीत 10 उमेदवार रिंगणात आहेत.
राजकीय पक्षांनी प्रथमच प्रतिष्ठेच्या केलेल्या स्वतः पक्ष म्हणून लक्ष घातलेल्या या निवडणुकीत भाजपाप्रणित शिक्षक परिषदेचे वेणुनाथ कडू, शिवसेनाप्रणित शिक्षक सेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे, कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीचे अशोक बेलसरे, भाजपाच्या शिक्षक परिषदेतून बंडखोरी करून उभे ठाकलेले सध्याचे आमदार रामनाथ मोते आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले शेकापचे बाळाराम पाटील हे प्रमुख उमेदवार आहेत.
आज मतदान होणार असून सोमवारी मतमोजणी आहे.