पक्ष्यांचा कोंडतोय श्वास

By Admin | Updated: November 11, 2014 23:44 IST2014-11-11T23:44:51+5:302014-11-11T23:44:51+5:30

गजबजलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागात मुळा-मुठा नदीच्या काठावर उभारण्यात आलेल्या सलीम अली पक्षी अभयारण्याची योग्य देखभालीअभावी दुरावस्था झाली आहे.

Kondotoy breathing of birds | पक्ष्यांचा कोंडतोय श्वास

पक्ष्यांचा कोंडतोय श्वास

राहुल कलाल ल्ल पुणो
गजबजलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागात मुळा-मुठा नदीच्या काठावर उभारण्यात आलेल्या सलीम अली पक्षी अभयारण्याची योग्य देखभालीअभावी दुरावस्था झाली आहे. येरवडयात असलेल्या या अभयारण्यात राजरोसपणो राडारोडा टाकण्यात येत असून पालिकेकडूनही कचरा टाकण्यात येत असून तो जाळण्याचे प्रकारही सर्रास घडत आहेत. अभयारण्यातील झाडांचीही अवैध कत्तल केली जात आहे. यामुळे वैविध्यपूर्ण पक्षींचे स्थान असलेल्या या अभयण्यातील पक्षीवैभव नामषेश होण्याची भिती निर्माण झाली आहे.
पुणो महापालिकेने हे अभयारण्य उभारले होते. उभारल्यानंतर मात्र पालिकेने त्याकडे सातत्याने दूर्लक्ष केले आहे. येरवडयातील मुळा-मुठा नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीमधून या अभयारण्यासाठी रस्ता जातो. मात्र तेथे यासंदर्भातील कोणताही फलक नसल्याने इथे अभयारण्य असल्याचे लक्षात येत नाही. हे अभयारण्य मोठया जागेत पसरले असून तेथे जैववैविधता आढळून येते. मात्र या अभयारण्याची प्रसिध्दी पालिकेने कधीच केलेली नाही. कोणत्याही सोयी-सुविधाही नसल्याने आणि अनेक पक्षीप्रेमी, निरीक्षकांना या पक्षी अभयारण्यात विविध प्रकारचे पक्षी पहायला मिळतात हे माहिती नसल्याने ते ओस पडले आहे. 
मुळा-मुठा नदीमध्ये दगडाची अनेक बेटे असल्याने तेथे विविध प्रकारचे पक्षी वास्तव्यास आलेले आहेत. पालिकेने हे अभयारण्य उभारल्यानंतर पात्रत दगडांचे बंधारे बांधून पक्षांसाठी अधिवास निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हे बंधारे पुरामुळे तुटले आहेत.
या अभयारण्यात आजूबाजूचे बांधकाम व्यावसायिक राडारोडा सर्रास आणून टाकत आहेत. पालिकेने ते दूर्लक्ष केले आहे. धक्कादायक बाब ही की पालिकेच्या कचरा नेणा:या गाडयाच या अभयारण्यात येवून कचरा टाकत आहेत. हा कचरा अनेकदा जाळला जात असल्याने अभयारण्यातील पक्षांवर त्याचा विपरीत परिणाम घडत आहे.
 
पक्षी निरीक्षकांसाठी 
बांधलेले ठिकाणही तुटलेले
अभयारण्यात पक्षी निरीक्षणासाठी येणा:यांना बसता यावे यासाठी बांधण्यात आलेले ठिकाणी पूर्णपणो तुटले असून त्याचा केवळ राडारोडाच तेथे पडलेला पहायला मिळतो. 
 
अभयारण्याचा फलकही नाही
येरवडयातील मुळा-मुठा नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीमधून या अभयारण्यासाठी रस्ता जातो. मात्र तेथे कोठेही अभयारण्याचा फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे शहरातील अनेक पक्षीप्रेमी, पक्षी निरीक्षकांना याची माहितीच नाही. विशेष म्हणजे, स्मशानभूमीतील पालिका कर्मचा:यांनाही इथे पक्षी अभयारण्य असल्याची माहिती नाही.
 
जंगलात आल्याचा येतो अनुभव
शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही या पक्षी अभयारण्यात गेल्यानंतर आपण शहरापासून दूर जंगलात आल्याचा अनुभव येतो. गर्द झाली असलेल्या या अभयारण्यात एक पायवाट असून त्यामार्गे आपण नदीपात्रत पक्षी पहायला जावू शकतो. मात्र नदीपात्रत उतरण्यासाठी पालिकेकडनू कोणत्याही सोयी करण्यात आलेल्या नाहीत.
 
बेटांवर पुरातून आलेल्या प्लॅस्टिकचे अधिराज्य
नदीला दरवर्षी येणा:या पुरामुळे पात्रतील बेटांवरील झाडांवर प्लॅस्टिक, कपडे मोठया प्रमाणात अडकले आहेत. त्याचा त्रस पक्षांना होत असून काही लहान पक्षी त्यात अडकत असल्याचेही चित्र आहे.
 

 

Web Title: Kondotoy breathing of birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.