शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनासाठी कोळी बांधवांना मिळणार आता विम्याचे संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 15:27 IST

कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचा निर्णय, कोळी बांधवामध्ये आनंदाचे वातावरण

कल्याण, दि. 22 - कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने गेल्या कित्येक वर्षापासून कोणत्याही अपेक्षेविना गणेश विसर्जन काळात आपली सेवा देणा-या कोळी बांधवाना यंदा विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कोळी बांधवामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. गणेश विर्सजन काळात कोळी बांधवांची नेहमीच महत्त्वाची भूमिका असते. गेल्या काही वर्षात घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ लक्षात घेता या कोळी बांधवांवरील जबाबदारी ही तेवढीच वाढली आहे.

मात्र आपल्या जीवावर उदार होऊन सर्व अडचणींना बाजूला सारत ही मंडळी बाप्पांचे निविघ्नपणे विसर्जन करीत आहेत. याकडे डोळेझाक करून चालणार नाही. या गोष्टींची दखल कल्याण शहर सावर्जनिक गणेशोत्सव महामंडळाने घेत त्यांना विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळांचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय मोरे आणि कार्याध्यक्ष डॉ. पंकज उपाध्याय यांनी पुढाकार घेत प्रत्येक कोळी बांधवांचा ३ लाख रूपयांचा अपघाती विमा काढण्याचे काम सुरू केले आहे.गणेश विसर्जन काळातील कोळी बांधवांचे योगदान अजिबात दुर्लक्षून चालणार नाही. त्यांनी कोणतेही अपेक्षा ठेवलेली नसली तरी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजत असल्याची प्रतिक्रिया मंडळांचे अध्यक्ष संजय मोरे यांनी दिली.

आतापर्यंत हे मंडळ केवळ बॅनर आणि होर्डिंग्जपुरताच मर्यादित असल्याची चर्चा केली जायची. मात्र यंदाच्या नवनिर्वाचित कार्यकारीणीने या प्रतिमेला छेद देत एक चांगला उपक्रम राबविला असून या भूमिकेचे निश्चितपणे स्वागत व्हायला हवे असे बोलले जात आहे. 

 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव