शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Mandlik: शिंदे गटासोबत जाणार की नाही? कार्यकर्त्यांच्या ठरावानंतर संजय मंडलिकांचे मोठे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 11:33 IST

Sanjay Mandlik Latest News: अस्सल सोन्याचे मीच बोललो होतो, परंतू शिवसेना टिकवायची वाढवायची असेल तर आपल्याला निर्णय घ्यावा लागेल, असे मंडलिक म्हणाले.

शिवसेनेला सोडून गेले ते बेंन्टेक्स होते व आता अस्सल सोनंच पक्षात राहिले, असे म्हणणारे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक हे शिंदे गटासोबत जाण्याची चर्चा सुरु झाली आहे. काल कोल्हापुरात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला, तो दिल्लीत असलेल्या मंडलिकांना कळविण्यात आला आहे. यावर आता संजय मंडलिकांची प्रतिक्रिया आली आहे. 

चार दिवसांपूर्वी शिवसेनेचे काही खासदार आपल्याला भेटले होते. त्यांनी शिंदे गटासोबत यावे, असे सांगितले. यावर मी त्यांना मी कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाही, असे सांगितले. पावसामुळे मी कोल्हापुरातील कार्यकर्त्यांना भेटू शकलो नाही. यामुळे मी त्यांना काल मेळावा घेण्यास सांगितले होते. यावर कार्यकर्त्यांनी आपण शिंदे गटासोबत जावे असे कळविले आहे, असे मंडलिक म्हणाले. 

आता पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. यावेळी हे खासदार पुन्हा भेटतील. परवाची चर्चा ही साधक बाधक होती. आता त्यांच्याशी विस्तृत चर्चा करेन आणि पुढचा निर्णय घेईन, असे मंडलिक म्हणाले. याचबरोबर मविआचा पहिला प्रयोग माझ्याच मतदारसंघात झाला होता. परंतू, राज्यातील सत्तेचा फायदा हा मित्रांना झाला, शिवसेनेला झाला नाही. यामुळे शिंदे गटासोबत एवढे आमदार गेले होते. अस्सल सोन्याचे मीच बोललो होतो, परंतू शिवसेना टिकवायची वाढवायची असेल तर आपल्याला निर्णय घ्यावा लागेल, असे मंडलिक म्हणाले. परंतू, सर्वांनी एकत्र यावे, असे आपल्याला वाटत असल्याचे मंडलिक म्हणाले. 

शिवसेनेचे पहिले खासदार.. शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाच्या काळात मंडलिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आधार देण्यासाठी मातोश्रीवर थांबून होते. पक्षाच्या या कसोटीच्या काळात शिवसेनेसोबतच आहात याबद्दल समाजांतूनही चांगल्या प्रतिक्रिया होत्या. कारण त्याच पक्षाने मंडलिक यांना एकदा सोडून दोनदा उमेदवारी दिली. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून आतापर्यंत १९९१ पासून गेल्या ३१ वर्षात शिवसेनेने सात उमेदवार दिले. परंतु ही जागा जिंकता आली नव्हती. ती मंडलिक यांच्या रुपाने पहिल्यांदा जिंकली. परंतु शिवसेनेच्या पहिल्या खासदाराने अडीच वर्षात पक्षाशी गद्दारी केली अशीच इतिहासात नोंद होईल. 

टॅग्स :Sanjay Mandalikसंजय मंडलिकEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर