Maharashtra Election Results 2024 : कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. पोस्टल मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर आता ईव्हीएम मशिनची आकडेवारी हाती आली आहे. सुरुवातीच्या कलानुसार, राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनी आघाडी घेतली आहे. तर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी आघाडी घेतली आहे.
इचलकरंजीतून भाजपचे राहूल आवाडे शरदचंद्र पवार गटाचे मदन कारंडे यांच्यापेक्षा सहाव्या फेरीअखेर १६ हजार मतांनी पुढे होते. राधानगरीतून शिंदेसेनेचे प्रकाश आबिटकर हे उद्धवसेनेचे के. पी. पाटील यांच्यापेक्षा सहाव्या फेरीअखेर ८ हजारांनी आघाडीवर आहेत. तर कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील आघाडीवर आहेत.कोल्हापूर उत्तरमधून सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये शिंदेसेनेचे राजेश क्षीरसागर पिछाडीवर आहेत.
(Maharashtra Vidhan Sabha Results 2024)
चंदगडमधून देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील आघाडीवर असून जनसुराज्य शक्तीचे संस्थापक विनय कोरे हे चौथ्या फेरीअखेर १६५१ मतांनी पिछाडीवर आहेत. करवीरमधून राहुल पाटील आघाडीवर आहेत.
कोण आहेत आघाडीवर? पाहा...
- कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर आघाडीवर
- राधानगरीमधून प्रकाश अबिटकर आघाडीवर
- कागलमधून हसन मुश्रीफ आघाडीवर
- इचलकरंजीमधून राहुल आवाडे आघाडीवर
- कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील आघाडीवर
- शिरोळमधून राजेंद्र पाटील आघाडीवर
- शाहूवाडी विनय कोरे आघाडीवर
- चंदगडमधून शिवाजी पाटील आघाडीवर
- करवीरमधून राहुल पाटील आघाडीवर
- हातकणंगले मधून अशोकराव माने आघाडीवर