‘कोल्हापूरच्या विमानसेवेसाठी प्रयत्न करणार’
By Admin | Updated: March 18, 2016 02:29 IST2016-03-18T02:29:42+5:302016-03-18T02:29:42+5:30
कोल्हापूरची विमानसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधणार असल्याची ग्वाही केंद्रीय संसदीय कामकाज

‘कोल्हापूरच्या विमानसेवेसाठी प्रयत्न करणार’
कोल्हापूर : कोल्हापूरची विमानसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधणार असल्याची ग्वाही केंद्रीय संसदीय कामकाज व अल्पसंख्याक विभागाचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी गुरुवारी येथे दिली. पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ‘प्लॅस्टो-२०१६’ प्रदर्शनाची कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील उद्योजकांना माहिती देण्यासाठी आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंत्री नक्वी म्हणाले, कोल्हापूरमधील वातावरण, आदरातिथ्य यामुळे अनेकांना कोल्हापूर आवडते. या शहराच्या विकासासाठी महत्त्वाची असणारी विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करेन.