ऑनलाइन लोकमत -
सिंधुदूर्ग, दि. 01 - आंबोली धबधब्यापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर दरड कोसळली असल्याने कोल्हापूर-सावंतवाडी मार्ग ठप्प झाला आहे. झाड आणि मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने मार्ग ठप्प झाला आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे दरड हटवण्यात अडचणी येत आहेत. सिंधुदुर्गात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे.
गेल्या 24 तासात कोकणात पावसाने धुमाकळू घातला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कणकवलीत जोरदार पाऊस कोसळतोय. तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड, चिपळूण, दापोली, मंडणगड या भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.