शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कोल्हापूर : आता पंधरा दिवस ‘आंदोलना’चे नाटक : ‘स्वाभिमानी’चे नाव न घेता सदाभाऊ खोत यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 18:44 IST

या हंगामात तयार होणाऱ्या साखरेसाठी राज्य व जिल्हा बॅँकांनी तारण ९० टक्के कर्ज कारखान्यांना द्यावे, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना ‘एफआरपी’चे पैसे देणे शक्य होईल, अशी माहिती कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर ऊसदराबाबत १५ दिवस आंदोलनाचे नाटक चालणार, असा टोलाही त्यांनी ‘स्वाभिमानी’चे नाव न घेता लगावला.

ठळक मुद्देबॅँकांकडून साखर तारणावर ९० टक्के कर्ज : सदाभाऊ खोत आता पंधरा दिवस ‘आंदोलना’चे नाटक

कोल्हापूर : या हंगामात तयार होणाऱ्या साखरेसाठी राज्य व जिल्हा बॅँकांनी तारण ९० टक्के कर्ज कारखान्यांना द्यावे, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना ‘एफआरपी’चे पैसे देणे शक्य होईल, अशी माहिती कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर ऊसदराबाबत १५ दिवस आंदोलनाचे नाटक चालणार, असा टोलाही त्यांनी ‘स्वाभिमानी’चे नाव न घेता लगावला.खोत म्हणाले, ‘ऊसदराच्या ‘एफआरपी’संदर्भात रयत क्रांतीच्या परिषदेमध्ये केलेली मागणीच जयसिंगपूरच्या परिषदेमध्ये करण्यात आली. यावरून आपण यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे हे आपल्याला माहीतच होते व यावरून आपणच या शाळेचा मुख्याध्यापक असल्याचे म्हणणे खरे ठरले आहे. रिकव्हरीचा साडेनऊचा बेस संपविला हे म्हणणे चुकीचे आहे; कारण ‘एफआरपी’चे पैसे देताना १० टक्के रिकव्हरीचे पैसे द्यावेत, असेच सूत्र करण्यात आले आहे.

हे जर चुकीचे वाटत असेल तर खासदार शेट्टी यांनी केंद्राच्या कृषिमूल्य आयोगाकडे मागणी करायला हवी होती. खासदार म्हणून ते त्यांनी ते मांडायला हवे होते; परंतु तसे न करता ते उलट रस्त्यावर येत आहेत. जयसिंगपूरची परिषद ही ‘सदाभाऊ बेस्ड’च होती. माझ्या पोस्टरला मारलेले चाबकाचे फटकारे म्हणजे मी अजून ही त्यांच्या मनामनांमध्ये आहे हे स्पष्ट होत आहे.दिवाळीच्या तोंडावर ऊस आंदोलनाचे नाटक पंधरा दिवस चालणार आहे. लोकांना भावनिक आवाहन केले जाणार आहे, हे आपल्याला माहीत आहे. दिवाळीनंतर ऊसतोड कामगार येतील व कारखानेही सुरू होतील. अडचणी असल्यास कारखाने सरकारकडे मदतही मागतील व त्यातून मार्ग निघाल्यास हे आपणच केले म्हणून ढोल बडवतील असाही टोला खोत यांनी लगावला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घाटगे, बी. एस. पाटील उपस्थित होते.

तूपकर म्हणजे तर नारळावर कुस्ती करणारा पैलवानजयसिंगपूरच्या परिषदेमध्ये रविकांत तूपकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्याला आता दाढी आली आहे; माझी पहिल्यापासून आहे. त्यामुळे त्याने पहिल्यांदा ग्रामपंचायतीला निवडून येऊन दाखवावे; तूपकर म्हणजे नारळावर कुस्ती करणारा पैलवान आहे. त्याला फार महत्व द्यायचे कारण नाही.

मी हातकणंगलेतूनचसदाभाऊ खोत यांनी कोडोलीच्या ऊस परिषदेतहीत हातकणंगलेतून निवडणूक लढवणार असल्याचे अप्रत्यक्षपणे जाहीर केले होते. मंगळवारी पत्रकार परिषदेत त्यांनी स्वत:हून हातकणंगलेमधून आपण निवडणूक लढविणार असल्याचे पुन्हा जाहीर केले.

नियमनमुक्ती शेतकऱ्यांच्या फायद्याचीशेतकऱ्यांचा संपूर्ण शेतीमाल नियमनमुक्त करावा, अशी मागणी दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांच्यापासून आम्ही करीत होतो. मध्यंतरीच्या काळात काही शेतीमाल नियमनमुक्त केला. आता सर्वच शेतीमाल नियमनमुक्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे, अशी माहिती खोत यांनी दिली. 

 

सुधारित : बॅँकांकडून साखर तारणावर ९० टक्के कर्जसदाभाऊ खोत यांची माहिती : आता पंधरा दिवस ‘आंदोलना’चे नाटक(खोत यांचा फोटो वापरावा)लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : या हंगामात तयार होणाऱ्या साखरेसाठी राज्य व जिल्हा बॅँकांनी तारण ९० टक्के कर्ज कारखान्यांना द्यावे, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना ‘एफआरपी’चे पैसे देणे शक्य होईल, अशी माहिती कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर ऊसदराबाबत १५ दिवस आंदोलनाचे नाटक चालणार, असा टोलाही त्यांनी ‘स्वाभिमानी’चे नाव न घेता लगावला.खोत म्हणाले, ‘ऊसदराच्या ‘एफआरपी’संदर्भात रयत क्रांतीच्या परिषदेमध्ये केलेली मागणीच जयसिंगपूरच्या परिषदेमध्ये करण्यात आली. यावरून आपण यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे हे आपल्याला माहीतच होते व यावरून आपणच या शाळेचा मुख्याध्यापक असल्याचे म्हणणे खरे ठरले आहे. रिकव्हरीचा साडेनऊचा बेस संपविला हे म्हणणे चुकीचे आहे; कारण ‘एफआरपी’चे पैसे देताना १० टक्के रिकव्हरीचे पैसे द्यावेत, असेच सूत्र करण्यात आले आहे. हे जर चुकीचे वाटत असेल तर खासदार शेट्टी यांनी केंद्राच्या कृषिमूल्य आयोगाकडे मागणी करायला हवी होती. खासदार म्हणून ते त्यांनी ते मांडायला हवे होते; परंतु तसे न करता ते उलट रस्त्यावर येत आहेत. जयसिंगपूरची परिषद ही ‘सदाभाऊ बेस्ड’च होती. माझ्या पोस्टरला मारलेले चाबकाचे फटकारे म्हणजे मी अजून ही त्यांच्या मनामनांमध्ये आहे हे स्पष्ट होत आहे.दिवाळीच्या तोंडावर ऊस आंदोलनाचे नाटक पंधरा दिवस चालणार आहे. लोकांना भावनिक आवाहन केले जाणार आहे, हे आपल्याला माहीत आहे. दिवाळीनंतर ऊसतोड कामगार येतील व कारखानेही सुरू होतील. अडचणी असल्यास कारखाने सरकारकडे मदतही मागतील व त्यातून मार्ग निघाल्यास हे आपणच केले म्हणून ढोल बडवतील असाही टोला खोत यांनी लगावला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घाटगे, बी. एस. पाटील उपस्थित होते.-------------------------------------------------------------------------तूपकर म्हणजे तर नारळावर कुस्ती करणारा पैलवानजयसिंगपूरच्या परिषदेमध्ये रविकांत तूपकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्याला आता दाढी आली आहे; माझी पहिल्यापासून आहे. त्यामुळे त्याने पहिल्यांदा ग्रामपंचायतीला निवडून येऊन दाखवावे; तूपकर म्हणजे नारळावर कुस्ती करणारा पैलवान आहे. त्याला फार महत्व द्यायचे कारण नाही.----------------मी हातकणंगलेतूनचसदाभाऊ खोत यांनी कोडोलीच्या ऊस परिषदेतहीत हातकणंगलेतून निवडणूक लढवणार असल्याचे अप्रत्यक्षपणे जाहीर केले होते. मंगळवारी पत्रकार परिषदेत त्यांनी स्वत:हून हातकणंगलेमधून आपण निवडणूक लढविणार असल्याचे पुन्हा जाहीर केले.------------------------------------------------------------------------------नियमनमुक्ती शेतकºयांच्या फायद्याचीशेतकºयांचा संपूर्ण शेतीमाल नियमनमुक्त करावा, अशी मागणी दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांच्यापासून आम्ही करीत होतो. मध्यंतरीच्या काळात काही शेतीमाल नियमनमुक्त केला. आता सर्वच शेतीमाल नियमनमुक्त शेतकºयांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे, अशी माहिती खोत यांनी दिली.-----------------------------------------------------

 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाkolhapurकोल्हापूर