शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
3
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
4
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
5
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
6
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
7
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
8
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
9
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
10
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
11
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
12
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
13
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
14
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
15
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
16
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
17
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
18
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
19
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
20
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur North By Election Result: आठव्या फेरीत भाजपला अधिक मतं; पण काँग्रेसची आघाडी कायम, ९ हजारांचं मताधिक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 10:17 IST

Kolhapur North By Election Result: महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्याकडे ८ हजार मतांची आघाडी

कोल्हापूर: काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेला कोल्हापूर विधानसभा मतदारसंघ कोणाकडे हे अवघ्या काही तासांत स्पष्ट होईल. मतमोजणीला सुरुवात झाली असून जाधव यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या उमेदवार आघाडीवर आहेत. मतमोजणीच्या पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये काँग्रेसनं सुस्साट कामगिरी केली. मात्र चौथ्या, पाचव्या फेरीत भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांना अधिक मतं मिळाली. त्यामुळे जाधव यांची आघाडी कमी झाली. मात्र सहाव्या फेरीत जाधव यांनी पुन्हा कदम यांना मागे टाकलं. त्यामुळे इथे चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. सध्या जयश्री जाधव यांना २७ हजार ३७० मतं मिळाली आहेत. त्यांच्याकडे ८ हजारहून अधिक मतांची आघाडी आहे.कोल्हापूर उत्तर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीतील ३५८ मतदान यंत्रांतील मतमोजणीचे केलेले नियोजन पाहता आज, शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे. प्रचाराची घसरलेली पातळी, आरोपप्रत्यारोपाने उडालेला धुरळा, भाजपाने शेवटच्या टप्प्यात आणलेला हिंदुत्वाचा मुद्दा, यामुळे ही निवडणूक कमालीची चुरशीची झाली होती. या ठिकाणी एकूण पंधरा उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी लढत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव विरुद्ध भाजपाचे सत्यजित कदम यांच्यात आहे. 

मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचारी मिळून ७६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर एक याप्रमाणे उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींना प्रवेश दिला जाईल. मतमोजणी कक्ष, तसेच बाहेरील परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत, तसेच परिसरात प्रतिनिधी, अधिकाऱ्यांना बसण्यासाठी मंडपही उभारण्यात आले आहेत. मतमोजणीदरम्यान परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी राज्य व केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले आहे.

कुणी कुठे थांबायचे..?मतमोजणीच्या काळात, तसेच निकाल लागल्यानंतर काही गडबड गोंधळ होऊ नये, याची खबरदारी घेताना पोलिसांनी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी थांबण्यास सांगितले आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना रजपूतवाडी एचपी गॅस गोडाऊनजवळ, भाजपाच्या कार्यकर्त्यांना शिवाजी विद्यापीठ यूथ बँकेजवळ, तर वंचित आघाडीसह अन्य उमेदवारांना शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाजवळ थांबण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरSatyajit Kadamसत्यजित कदमBJPभाजपाcongressकाँग्रेस