कोल्हापूर - अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी नवी यंत्रणा
By Admin | Updated: August 1, 2016 18:23 IST2016-08-01T18:23:14+5:302016-08-01T18:23:14+5:30
करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने. पूर्वीच्या कंपनीचा करार रविवारी संपुष्टात आल्यामुळे नवीन

कोल्हापूर - अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी नवी यंत्रणा
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १ - करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने. पूर्वीच्या कंपनीचा करार रविवारी संपुष्टात आल्यामुळे नवीन प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नेमणूक आज सोमवारपासून केली आहे. त्यात ४0 पुरुष, तर १२ महिला सुरक्षा रक्षक आहेत.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेले करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात दररोज लाखो भाविक भेट देतात. त्यामुळे या भाविकांच्या व मंदिराच्या सुरक्षेसाठी देवस्थान समितीने यापूर्वी ४३ सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती. या सुरक्षा रक्षकांची मुदत रविवारी, (दि. ३१ जुलै) संपुष्टात आली. त्यामुळे देवस्थान समितीने महाराष्ट्र राज्य शासनाची मान्यताप्राप्त असलेल्या कोल्हापूर सुरक्षा बोर्डाकडून एकूण ५२ सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याचे ठरविले होते . त्यानुसार हे सुरक्षा रक्षकांची नेमणूक आज सोमवारपासून केली, हे सर्वजण मोठी आपत्ती आल्यानंतर त्याला तोंड देण्यासाठी प्रशिक्षितही केले आहेत. त्यानुसार त्यांचे प्रशिक्षण यापूर्वीच बोर्डाकडून घेण्यात आले आहे.