शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता कोल्हापूर ते मुंबई सायकल प्रवास
By Admin | Updated: May 8, 2017 06:32 IST2017-05-08T06:32:14+5:302017-05-08T06:32:14+5:30
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण, कर्जाचे ओझे आदी प्रश्नांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी येथील शेतकऱ्याने

शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता कोल्हापूर ते मुंबई सायकल प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण, कर्जाचे ओझे आदी प्रश्नांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी येथील शेतकऱ्याने थेट मुंबई गाठले. ७०० किलोमीटरचा हा प्रवास सायकलने पूर्ण करत या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षण, शिवस्मारक, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर आदींबाबत जनजागृती केली. २५ एप्रिलला हा प्रवास सुरू केला.
संपतराव खाके हे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांचे वय ३३ वर्षे आहे. प्रलंबित मागण्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने हा प्रवास करत असल्याची माहिती खाके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कोल्हापूर ते रायगड, त्यानंतर पाली आणि मुंबई गाठले. येत्या आठवडाभरात खाके स्वत: मुख्यमंत्र्यांना भेट देऊन मागण्यांचे निवेदन सादर करणार आहेत.
प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्ज मुक्ती, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा व शेतीमाल उत्पादन खर्चावर आधारित कायद्याने हमी बाजारभाव मिळायला हवा
मराठा आरक्षण आणि आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी ईबीसी उत्पन्न मर्यादा सहा लाख करा
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ उच्च शिक्षण, प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी कार्यरत करा
कोपर्डी घटनेसह महिलांवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना तत्काळ फाशी द्या
अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये, याकरिता कायद्यात बदल करण्यात यावा
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासनाने ठोस कृती आराखडा आखावा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लवकरात लवकर उभे राहावे.