शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राजघराण्यात दत्तक ही गोष्ट नवी नाही, पण...; संजय मंडलिकांच्या विधानावर शरद पवार संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 18:35 IST

Kolhapur Loksabha Election - कोल्हापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शाहू छत्रपती हे दत्तक असल्याचं विधान मंडलिक यांनी केले. त्यावर विरोधकांनी फटकारलं आहे.

पुणे - Sharad Pawar on Sanjay Mandalik ( Marathi News ) कोल्हापूरात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी मविआ उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे नवा वाद झाला आहे. आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे असं विधान मंडलिक यांनी केले. त्यावर शरद पवारांनी राजघराण्यात दत्तक ही गोष्ट नवी नाही असं भाष्य केले आहे.

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, अनेक राजघराण्यामध्ये दत्तक ही गोष्ट नवी नाही. त्यांच्यावर भाष्य केलं म्हणजे विरोधकांनी किती खालची पातळी गाठली ते पाहावं. मूळ शाहू महाराजांचा सेवेचा गुण होता, तीच भूमिका आत्ताच्या शाहू महाराजांनी घेतली आहे. अशा व्यक्तिमत्वावर टीका केली जात आहे. यातून विरोधकांची मानसिकता दिसून येत आहे असा टोला शरद पवारांनी लगावला. 

काय आहे वाद?

गडहिंग्लज येथे बुधवारी झालेल्या प्रचार सभेत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू छत्रपतींवर भाष्य केले. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपला. आखाड्यात उतरल्यानंतर विरोधी मल्लाला हातच लावायचा नाही. त्या मल्लाला टांगच मारायची नाही. मग कुस्ती तरी कशी होणार अशी विचारणा करत मंडलिक यांनी ही आक्रमक भूमिका घेत आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे असं त्यांनी म्हटलं होतं. 

संजय राऊतांनी मंडलिकांना फटकारलं

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी महाराष्ट्राच्या जनतेला नितांत आदर आहे. छत्रपतींच्या गादीवर ते विराजमान आहेत. गादीचा अपमान जर कोणी करत असेल तर महाराष्ट्र ते सहन करणार नाही. शाहू महाराजांनी या महाराष्ट्राला सामाजिक दिशा देण्याचा प्रयत्न केला त्या गादीचे ते वारसदार आहेत. छत्रपती शाहूंच्या गादीचा मान राखायचा नाही तर काय मोदींच्या गादीचा मान राखायचा का? असं यांना वाटतंय का असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

त्याचसोबत डुप्लिकेट शिवसेनेने सर्व ताळतंत्र सोडलं आहे आता ते छत्रपती शाहू महाराजांपर्यंत पोहोचले. त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे ते बोलत आहेत ते योग्य नाही. छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि जे ज्यांनी वक्तव्य केले ते डुप्लिकेट शिवसेनेचे उमेदवार आहेत. संजय मंडलिक हे डुप्लिकेट माल आहेत, त्यांना कोल्हापूरची जनता घरी बसल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी महाराजांची गादी आहे, त्या गादीविषयी सर्वांनी सन्मान ठेवला पाहिजे अशा शब्दात राऊतांनी संजय मंडलिकांना फटकारलं.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४kolhapur-pcकोल्हापूरbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Sanjay Rautसंजय राऊत