शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

किरीट सोमय्यांच्या कोल्हापूर दौऱ्याचा मार्ग मोकळा; जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा बंदी उठवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 21:43 IST

Kirit Somaiya : कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरील जिल्हाबंदी हटवली आहे. यामुळे किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा आता नॉनस्टॉप होणार आहे.

कोल्हापूर :  भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरील निर्बंध कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी हटवले आहेत. यामुळे आता किरीट सोमय्यांच्या दौऱ्यातला अडथळा दूर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच, कोल्हापूरमधील कारखान्याची पाहणी करुन पोलिसांत मुश्रीफांविरोधात तक्रार सोमय्या तक्रार करणार आहेत. 

कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरील जिल्हाबंदी हटवली आहे. यामुळे किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा आता नॉनस्टॉप होणार आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन जारी करत याची घोषणा केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, २८ सप्टेंबर रोजी किरीट सोमय्या यांचा नियोजित कोल्हापूर दौऱ्यादरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी माझी खात्री झाली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी बाबतचा पारित केलेला आदेश विखंडित करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यासाठी किरीट सोमय्या कोल्हापूरला जाणार होते. मात्र, त्यावेळी मुश्रीफ समर्थक संतप्त झाले होते. त्यामुळे किरीट सोमय्यांच्या दौऱ्यादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर जिल्हाबंदी लागू केली होती. परंतु अखेर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरील जिल्हाबंदी आता हटवली आहे.

जिल्हाबंदी हटवल्यानंतर किरीट सोमय्यांची प्रतिक्रियाकेंद्र सरकारनं ठाकरे सरकार आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी, पोलिसांना नोटीस पाठवली की जर किरीट सोमय्यांची गनिमी काव्यानं हत्या करण्यात येणार होती तर त्याची माहिती आम्हाला का दिली नाही? आणि ते कोण करणार होतं ते शोधून काढावं. मी जिल्हाधिकारी, एसपी आणि ठाकरे सरकारला सोडणार नाही. गेल्यावेळी खोट बोलून त्यांनी तो प्रतिबंधात्मक आदेश काढला होता. त्यांना उत्तर द्यावंच लागणार. ठाकरे सरकारमध्ये दम नाही किरीट सोमय्यांना थांबवण्याचा. मोदींच्या आदेशाप्रमाणे आम्ही घोटाळामुक्त महाराष्ट्र करु, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हाबंदी उठवल्यावर दिला आहे.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर