शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या देवदासीचा मुलगा बनणार ‘महाराष्ट्राचा ढोलकीसम्राट’ ?

By admin | Updated: February 3, 2017 00:41 IST

रविवारी महाअंतिम फेरी : त्याची बोटे धरायला लावतात ठेका

कोल्हापूर : वडील लहानपणी वारलेले.. आई देवदासी... त्यामुळे दारोदारी चौंडकं वाजवत आईच्या मागून जोगवा मागत फिरणारा तो.. परंतु त्याच्या बोटांत जादू आहे... तो ढोलकीच्या तालावर डोलायला लावतो.. भार्गव पुंडलिक कांबळे असे त्याचे नाव. येत्या रविवारी (दि. ५) सह्याद्री वाहिनीवरील ‘ढोलकी झाली बोलकी’ कार्यक्रमात तो महाअंतिम फेरीत भाग घेणार आहे. ही स्पर्धा जिंकण्याची ऊर्मी त्याच्या मनात व बोटांतही आहे. जगण्याशी संघर्ष करत अनंत अडचणींवर मात करून कसे यशस्वी होता येते याचा वस्तुपाठच त्याने घालून दिला आहे.भार्गव कोल्हापुरातील वारे वसाहत परिसरातील झोपडपट्टीमध्ये राहणारा. तो वर्षाचा असतानाच वडिलांचे छत्र हरपले. उदरनिर्वाह करण्यासाठी आई जोगवा मागायची. त्याआधारे त्यांनी दोन बहिणी व भार्गवचे संगोपन केले. मुलगा वसाहतीत राहिला तर बिघडेल म्हणून त्याला जोगवा मागायला घेऊन जात. आईला मदत व्हावी म्हणून तो चौंडकं शिकला. त्याचे शिक्षण कसेबसे सातवीपर्यंत झाले, परंतु चौंडकं वाजवून आयुष्य घडणार नाही, हे माहीत असलेल्या आईने त्याला तबला शिकायला लावला; परंतु घराचे बांधकाम केल्यावर पैशांअभावी तबल्याचा क्लास बंद करावा लागला. मग तो भजनी मंडळात जाऊन ढोलकी वाजवू लागला. त्यातीलच एका सवंगड्याने त्याला शिवशाहीर राजू राऊत यांची भेट घालून दिली. राऊत यांनी भार्गवची दोन वर्षांची फी भरून त्यास महेश देसाई यांच्याकडे तबला शिकायला पाठविले. राऊत यांना तो शाहिरी कार्यक्रमातही साथ करू लागला; त्याला पहिली संधी गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या ‘गावरान मेवा’ या कार्यक्रमात मिळाली. पुढे त्याने झंकार आॅर्केस्ट्रामध्येही काम केले. ढोलकीचे कार्यक्रम करत असतानाच तो सचिन कचोटे यांच्याकडे तबल्याचे प्रशिक्षणही घेत राहिला. आताही ढोलकीपटू पांडुरंग घोलकर (मुंबई) यांच्याकडे तो गेली चार वर्षे ढोलकीचे धडे घेत आहे. याच दरम्यान सह्णाद्री वाहिनीवर ‘ढोलकीचा रिअ‍ॅलिटी शो’ सुरू होत असल्याचे त्याला समजले. घोलकर यांनी त्यास ‘या शोमधून तुला काहीतरी मिळेल म्हणून जाऊ नकोस तर नवीन काही तरी शिकायला मिळेल; असा विचार करून जा,’ असा सल्ला दिला. त्यानुसार त्याने या स्पर्धेत भाग घेतला आहे. आता तो महाअंतिम फेरीपर्यंत धडकला असून रविवारी (दि. ५) होणाऱ्या कार्यक्रमात त्याची स्पर्धा रामचंद्र कांबळे (सातारा), ओंकार इंगवले (पुणे), आणि नांदेडच्या भद्रे या ढोलकीपटूंशी आहे.संगीतातील मान्यवरांची साथ..भार्गव ढोलकीचा नाद जपतच ‘दादांची दुनियादारी’ हा कार्यक्रमही करतो. त्याचा तीस कलाकारांचा गु्रप आहे. दादा कोंडके यांच्या गाण्यांवर तो आधारित आहे. त्याशिवाय त्याने संगीतकार बाळ पळसुले, संजय गीते, विठ्ठल उमाप, उषा मंगेशकर, उत्तरा केळकर, वर्षा उसगांवकर, सुरेश वाडकर यांंच्या कार्यक्रमांतही ढोलकीची साथ केली आहे.