शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वडाप चालकाच्या मुलाची 'गरुड भरारी'; भारतीय वायुसेनेच्या स्पेशल फोर्समध्ये निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 14:49 IST

झारखंड, सिक्कीम व महाराष्ट्र या तीनही राज्यांच्या एकत्रित निकालात तेजसने आठवा तर महाराष्ट्रात तिसरा क्रमांक मिळवला आहे.

कागलः तमनाकवाडा (ता.कागल) येथील तेजस रघुनाथ शिंत्रे याची भारतीय वायुसेनेत स्पेशल फोर्समध्ये गरुड कमांडो म्हणून निवड झाली. महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकाने तो या परीक्षेत उत्तीर्ण झाला. रविवारी या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला.

भारतीय वायुसेनेच्या वतीने जुलै २०१९ मध्ये पुणे येथे निवड परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेस झारखंड, सिक्कीम व महाराष्ट्र या राज्यातून एकुण ३८९ विद्यार्थी बसले होते. यामध्ये झारखंड, सिक्कीम व महाराष्ट्र या तीनही राज्यांच्या एकत्रित निकालात तेजसने आठवा तर महाराष्ट्रात तिसरा क्रमांक मिळवला आहे. लाँकडाऊननंतर त्याचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.

तेजसची घरची परिस्थिती सर्वसामान्य असून वडील कापशी- बाळेघोल रस्त्यावर रिक्षातून वडापचा व्यवसाय करतात. तेजसचे माध्यमिक शिक्षण सेनापती कापशी येथील रानडे हायस्कूलमध्ये झाले असुन सध्या तो देवचंद महाविद्यालयात बी.एस.सी. च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील तेजने मिळविलेल्या या यशाबद्दल परिसरात कौतुक होत आहे.

हवाई दलातील उच्च पदावर काम करण्यासाठी माझी इच्छा असून त्यासाठी सर्वतोपरी मेहनत घ्यायची तयारी आहे. ही यशाची पहिली पायरी आहे, अशा भावना तेजसनं व्यक्त केल्या. तेजस परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचं समजल्यानंतर घरच्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. मित्रांनी गावात फटाके फोडून आपला आनंद साजरा केला.  

आणखी वाचाः

2 चालक, 22 प्रवासी, 4600 किमी अंतर!... 'लाल परी'च्या विक्रमी प्रवासाची 'वादळी' गोष्ट

…अन् ३ वर्षाच्या चिमुरडीला थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फोन लावतात; ऑडिओ क्लीप व्हायरल

जरा हटके! ध्येयवेडा अभियंता झोपडीतून देतो गोरगरीबांना शिक्षणाचे धडे

जे बात!...म्हणून त्यानं सगळी संपत्ती दोन हत्तींच्या नावावर केली, रक्ताचे नातलगच झाले वैरी!

 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल