कोल्हापुरात कळंबा टोलनाका फोडला
By Admin | Updated: April 5, 2015 01:46 IST2015-04-05T01:46:38+5:302015-04-05T01:46:38+5:30
गारगोटीहून कोल्हापूरकडे येणारी कार अडविल्याच्या कारणावरून चालक व कळंबा टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांत झालेल्या वादावादीतून संतप्त नागरिकांनी कळंबा टोलनाका फोडला.

कोल्हापुरात कळंबा टोलनाका फोडला
कोल्हापूर : गारगोटीहून कोल्हापूरकडे येणारी कार अडविल्याच्या कारणावरून चालक व कळंबा टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांत झालेल्या वादावादीतून संतप्त नागरिकांनी कळंबा टोलनाका फोडला. ही घटना शनिवारी सकाळी घडली. हा प्रकार समजताच करवीर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. त्यानंतर सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी करवीर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, टोलनाक्याचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद आय.आर.बी. कंपनीचे कर्मचारी उमाकांत नारायण राजमाने यांनी दिली.
गारगोटी (ता. भुदरगड) येथील सुरेश आनंदराव जाधव हे कुटुंबीयांसह नवीन वॅगन आरमधून कळंबा टोलनाक्यावर आले. तेव्हा त्यांचा वाद झाला. या वादातून संतप्त जमावाने टोलनाक्यावरील केबिन व दिसेल त्या साहित्याची तोडफोड सुरू केली. (प्रतिनिधी)