ज्ञान हाच भारतीय संस्कृतीचा पाया

By Admin | Updated: January 31, 2015 05:03 IST2015-01-31T05:03:30+5:302015-01-31T05:03:30+5:30

भारतीय संस्कृती प्राचीन असून, दरवेळी ती नव्याने प्रकट होत असते. ज्ञान हेच या संस्कृतीचे अधिष्ठान अर्थात पाया असल्याने पुढील पिढीसाठी तिचे

Knowledge is the foundation of Indian culture | ज्ञान हाच भारतीय संस्कृतीचा पाया

ज्ञान हाच भारतीय संस्कृतीचा पाया

नाशिक : भारतीय संस्कृती प्राचीन असून, दरवेळी ती नव्याने प्रकट होत असते. ज्ञान हेच या संस्कृतीचे अधिष्ठान अर्थात पाया असल्याने पुढील पिढीसाठी तिचे संवर्धन करणे आपणा सर्वांचीच जबाबदारी असली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभाप्रसंगी ते म्हणाले, भारतीय संस्कृती ही अलौकिक, पुरातन आणि तितकीच सनातन असूनही तिचे महत्त्व आजही अबाधित आहे. विद्यापीठाचा कार्यविस्तार आणि अभ्यासक्रमांची व्याप्ती पाहता ते जागतिक स्तरावर ‘मेगा युनिव्हर्सिटी’ म्हणून नावारूपास येण्यासाठी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांचे प्रयत्न पथदर्शी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
२७ हजार १९० पदविका, ९८ हजार ४२६ पदवी, ६ हजार ६९१ पदव्युत्तर पदवी आणि २० विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना कर्तव्याची शपथ दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Knowledge is the foundation of Indian culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.