जानकर शिवसेनेसोबत जाणार?

By Admin | Updated: January 5, 2016 03:20 IST2016-01-05T03:20:34+5:302016-01-05T03:20:34+5:30

राष्ट्रवादीच्या टग्यांचा माज जिरवला आहे. आता भाजपाला धडा शिकविणार आहे़ त्यांच्या सत्तेच्या गाजराला मी ठोकर मारतो

Knowing with Shiv Sena? | जानकर शिवसेनेसोबत जाणार?

जानकर शिवसेनेसोबत जाणार?

जामखेड(अहमदनगर) : राष्ट्रवादीच्या टग्यांचा माज जिरवला आहे. आता भाजपाला धडा शिकविणार आहे़ त्यांच्या सत्तेच्या गाजराला मी ठोकर मारतो. गरज पडली तर मी शिवसेनेसोबत राहील, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला.
राज्यात भाजपाची सत्ता आणण्यासाठी १८० सभा घेतल्या. पक्षाने स्व:खर्चाने हेलिकॉप्टर घेतले़ भाजपाकडून दमडीही घेतली नव्हती. सत्ता आल्यावर यांना सत्तेचा उन्माद चढला आहे. आता ते मित्रपक्षाला दुश्मन समजतात, असेही त्यांनी सांगितले़
जानकर म्हणाले, भाजपाची स्थापना दिल्लीत तर शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे यांची स्थापना मुंबईत झाली. मात्र रासपाची स्थापना राजमाता अहिल्यादेवी यांच्या जन्मगावी चौंडी येथे वीस वर्षापूर्वी झाली. त्यामुळे या मातीशी माझी नाळ जुळलेली आहे. सध्याचे मंत्री राम शिंदें यांना आमच्यामुळे मंत्री पद मिळाले. मात्र, ते आता विसरले असून, मंत्रीपदाचा वापर आमच्या उमेदवाराला धमकावण्यासाठी करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला़ (तालुका प्रतिनिधी)
पुढच्या निवडणुकीत भाजपाविरोधात लढणार
राष्ट्रवादी हा तर गुंडांचा पक्ष आहे. बारामतीत आम्ही पवार घराण्याविरोधात लढतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत येऊन पवारांचा उदोउदो करतात. तुम्ही काय मित्रपक्षाला गाडायला निघाले काय? असा सवाल करून जानकर म्हणाले, पुढच्या निवडणुका भाजपाविरोधात लढू़ लोकसभा, विधानसभा व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत रासपा पूर्ण ताकदीने उतरणार आहे़ भाजपाला हरविणे,
हेच आमचे टार्गेट असल्याचे सांगत त्यांनी दक्षिण लोकसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नाहटा हे निवडणूक लढवतील, असे त्यांनी सांगितले़

Web Title: Knowing with Shiv Sena?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.